बहुजन समाजाने मदत केली म्हणून औरंगाबादेत इम्तिहाज जलील जिंकले- प्रकाश आंबेडकर

औरंगाबादेत एमआयएमचे इम्तिहाज जलील यांना लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली होती. ते मुस्लिम उमेदवार आहे. बहुजन समाजाने त्यांना मदत केली म्हणून ते निवडणूक जिंकले, खासदार झाले.

News18 Lokmat | Updated On: May 26, 2019 03:37 PM IST

बहुजन समाजाने मदत केली म्हणून औरंगाबादेत इम्तिहाज जलील जिंकले- प्रकाश आंबेडकर

मुंबई, 26 मे- औरंगाबादेत एमआयएमचे इम्तिहाज जलील यांना लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली होती. ते मुस्लिम उमेदवार आहे. बहुजन समाजाने त्यांना मदत केली म्हणून ते निवडणूक जिंकले, खासदार झाले, असा दावा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडी नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. काँग्रेसच्या सांगण्यावरून मुस्लिम मौलवीनी फतवा काढल्याने आम्हाला मुस्लिम मते कमी मिळाली. काँग्रेस आम्हाला भाजपची 'बी टीम' समजते, असेही आंबेडकरांनी यावेळी सांगितले.

प्रकाश आंबेडकर हे मुंबईत बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही एमआयएमला सोबत घेऊन लढणार आहे. आम्हाला नक्की याचा फायदा होईल, असा विश्वास प्रकाश आंबेडकरांनी यावेळी व्यक्त केला आहे.

'ते' ट्विटर खाते आणि ट्वीट माझे नाहीच..

'काँग्रेसला या पुढे वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करायची असेल, तर ती समसमान पातळीवर येऊनच करावी लागेल. कारण काँग्रेससोबत राजकीय गुलामीची व्यवस्था संपली आहे.', असे ट्वीट भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आले होते. हे ट्वीट सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 'हे' ट्विटर खाते आणि ट्वीट माझे नाहीच, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. अशा कोणत्याही स्वरुपाचे ट्वीट आपण केलेले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. काँग्रेससोबत समसमान पातळी चर्चा याबाबत तूर्तास काहीच भूमिका नाही. वंचित बहुजन आघाडीची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. त्यात चर्चा करुन पुढील भूमिका घेतली जाईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.

संजीव पुनाळेकरांच्या अटेकवर काय म्हणाले आंबेडकर?

Loading...

पुनाळकरांची अटक ही जहाल हिंदुत्ववादी संघटनांना मोदी सरकारने दिलेला इशारा आहे. आजवर ही कारवाई का झाली नाही याचे उत्तर दोन्ही सरकारने द्यावे, यापुढे मोदीविरुद्ध जहाल हिंदुत्ववादी संघटना असा संघर्ष सुरु होईल, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकरांनी टीका केली.


VIDEO:महिलेने बाळासह लोकलसमोर मारली उडी; आश्चर्यकारकरित्या बचावले बाळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2019 03:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...