आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, जागावाटपावरून काँग्रेसला पुन्हा अल्टिमेटम

आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, जागावाटपावरून काँग्रेसला पुन्हा अल्टिमेटम

जागावाटपासाठी फार काळ कुणासाठी थांबणार नसल्याचं सांगत आंबेडकरांनी काँग्रेसला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. यावेळी बोलताना त्यांनी सत्ताधारी भाजपवरही टीका केली आहे.

  • Share this:

मुंबई, 27 ऑगस्ट : वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी 31 ऑगस्टला जागावाटपाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं सांगितलं आहे. त्याचवेळी जागावाटपासाठी फार काळ कुणासाठी थांबणार नसल्याचं सांगत आंबेडकरांनी काँग्रेसला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. यावेळी बोलताना त्यांनी सत्ताधारी भाजपवरही टीका केली आहे. केवळ विरोधक नव्हे तर पक्षांतर्गत विरोधकांनाही संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप यावेळी प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्र्य़ांवर केला आहे.

'या विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष काय कार्यक्रम घेणार हे लोकांना माहित हवं. मी तेच करतोय. आम्ही नेमकं काय करणार आहोत लोकांना सांगतोय' असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. असददुद्दीन ओवेसींची आणि माझी भेट काही कामामुळे होऊ शकली नाही. पण ज्याक्षणी मी ओवेसींबरोबर बैठक घेईन त्याक्षणी जागावाटपाचा प्रश्न मार्गी लागेल, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

तर वंचितसोबत एमआयएम असून कुठल्याही प्रकारचे वाद नाहीत, असं एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असाउद्दीन ओवेसी यांनी स्पष्ट केलं आहे. मागील आठवड्यात वंचितमध्ये जागावाटपासंदर्भात एमआयएमला विचारात घेतल जात नाही, असं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी म्हटलं होतं. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. पण असा कोणताही वाद नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

इतर बातम्या - खळबळजनक! रस्त्यात तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला; चेहरा, पाठीवर केले सपासप वार

दरम्यान, MIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी जागावाटपावर नाराजी व्यक्त केल्यानंतर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी 'न्यूज18 लोकमत'कडे प्रतिक्रिया व्यक्त केली होती. ते म्हणाले की, MIM आणि आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत. 26 ऑगस्टला मी हैदराबादला जाणार असून त्या दिवसी जागावाटपावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. इम्तियाजला जे वाटलं ते तो बोलला, काँग्रेस मधल्या मुसलमनासारखं नाही, वंचित मधल्या मुसलमानाना बोलण्याची मोकळीक आहे असंही ते म्हणाले होते.

इतर बातम्या - भाजप आणि राष्ट्रवादीच्या 2 नेत्यांमध्ये जुंपली, समोर येण्याचं खुल्लं आवाहन

आम आदमी पक्षासोबतही बैठक होणार असून त्यांनाही वंचितमध्ये सामावून घेतलं जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली होती. वंचित आघाडीत MIM ने 74 जागा मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी काँग्रेसला 144 जागांची ऑफर दिली होती. मात्र, ही ऑफर काँग्रेस स्वीकारण्याची शक्यता नाही. त्यामुळे लोकसभेचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या सर्व 288 जागा लढविण्याची वंचितची तयारी असल्याचा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला होता.

SPECIAL REPORT : इंदापूरमध्ये राष्ट्रवादीची वाढणार डोकेदुखी, बंडखोरावर भाजपचा डोळा?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 09:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading