मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मंत्रिमंडळात एकाही अपक्ष आणि मित्रपक्षाला स्थान नाही; नाराज बच्चू कडूंनी केला 'प्रहार'

मंत्रिमंडळात एकाही अपक्ष आणि मित्रपक्षाला स्थान नाही; नाराज बच्चू कडूंनी केला 'प्रहार'

बच्चू कडू म्हणाले, की 'मी नाराज नाही पण नाराजी सरळ चेहऱ्यावर झळकत आहे. 'अडचण आहे' असं सांगून मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं गेलं नाही.

  • Published by:  Kiran Pharate
मुंबई 09 ऑगस्ट : महिनाभरापासून रखडलेला राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा आज अखेर पार पडला. पहिल्या टप्प्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजप मिळून एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, मंत्रिमंडळात एकाही अपक्ष किंवा मित्र पक्षाला स्थान दिलं गेलं नाही. यावर आता प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंंदे गटाचं 'मिशन सुरत-गुवाहाटी' फत्ते करणारे रवींद्र चव्हाणांना बक्षीस! याबद्दल बोलताना बच्चू कडू म्हणाले, की 'मी नाराज नाही पण नाराजी सरळ चेहऱ्यावर झळकत आहे. 'अडचण आहे' असं सांगून मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं गेलं नाही. मात्र, सर्व अपक्ष एकत्र आहेत असं समजू नका, असा इशाराही त्यांनी दिला. पुढे ते म्हणाले, की लवकरच दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, असं मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे. एकंदरीतच दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात तरी अपक्ष आणि मित्र पक्षांना स्थान मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे. शिंदे गट आणि भाजप सरकारमधील मित्रपक्ष आणि अपक्ष आमदार यांना पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जागा न मिळाल्यामुळे नाराजी असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. बच्चू कडू म्हणाले, की पहिल्या टप्प्यातील विस्तारामध्ये अपक्ष आणि मित्रपक्षांना स्थान द्यायला हवं होतं. खरंतर अपक्ष आणि मित्रपक्षांनी मिळून हे सरकार बनलं आहे. त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की महिन्याभरात जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल, तेव्हा अपक्ष आणि मित्रपक्षाचा नक्की विचार केला जाईल. काही अडचणींमुळे या टप्प्यात विचार केला नसेल. मात्र, महिन्याभरात काय होतं बघू, असंही ते म्हणाले .
First published:

Tags: Eknath Shinde

पुढील बातम्या