Home /News /maharashtra /

घरात लाखभर पुस्तकं; वर्षाला करतात 60 हजारांच्या पुस्तकांची खरेदी, जाणून घ्या वाचनप्रेमी विठ्ठलराव देशमुख यांच्याबद्दल 

घरात लाखभर पुस्तकं; वर्षाला करतात 60 हजारांच्या पुस्तकांची खरेदी, जाणून घ्या वाचनप्रेमी विठ्ठलराव देशमुख यांच्याबद्दल 

स्वत:ला समृद्ध करण्यासाठी, धकाधकीच्या जीवनात मानसिक शांती मिळवण्यासाठी, तसेच जगातील नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी, आपलं अज्ञान दूर करण्यासाठी वाचन (reading) हा एक चांगला पर्याय आहे. म्हणून वाचनाची आवड असलेले आपण अनेक जण पाहिले असतील. असेच एक वाचनवेड्या (books lover) व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घेऊया.

पुढे वाचा ...
  लातूर, 24 एप्रिल : स्वत:ला समृद्ध करण्यासाठी, धकाधकीच्या जीवनात मानसिक शांती मिळवण्यासाठी, तसेच जगातील नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी, आपलं अज्ञान दूर करण्यासाठी वाचन (reading) हा एक चांगला पर्याय आहे. म्हणून वाचनाची आवड असलेले आपण अनेक जण पाहिले असतील. असेच एक वाचनवेड्या (books lover) व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घेऊया. 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उदगीर येथे त्यांनी भेट दिली. दरवर्षी तब्बल 50-60 हजारांची पुस्तके खरेदी - या वाचनवेड्या व्यक्तिमत्त्वाचं नाव विठ्ठलराव जानराव देशमुख असं आहे. साहित्य संमेलनाला ते मेहकर बुलढाणा येथून आले. विठ्ठलराव यांना रावसाहेब असेही म्हणतात. त्यांच्यासोबत त्यांचे दोन सहकारी देखील सोबत होते. विठ्ठलराव यांच्या खोलीत जवळपास लाखभर पुस्तकं आहेत. इतकंच नव्हे तर ते दरवर्षी तब्बल 50-60 हजारांची पुस्तके खरेदी करतात. त्यांनी आजपर्यंत एकही साहित्य संमेलन चुकवलं नाही. तसेच साहित्य संमलेनाला येण्याचा उद्देश्य फक्त पुस्तके खरेदी करणे हाच आहे. वाचनप्रेमी विठ्ठलराव जानराव देशमुख साहित्य संमेलनात पुस्तक करेदी करताना
  वाचनप्रेमी विठ्ठलराव जानराव देशमुख साहित्य संमेलनात पुस्तक करेदी करताना
  प्रतिमाह उत्पन्न 25 लाख तरी...  विशेष म्हणजे ते फक्त खरेदी करत नाहीत. तर ते वाचतातही. त्यांच्या वाचनाची वेळ दुपारी 2 ते सायंकाळी 6 अशी आहे. त्यांच्या गावात त्यांना विशेष मान आहे. त्यांच्याकडे शेती आहे. त्याचे प्रतिमाह उत्पन्न 25 लाख इतके आहे. तरीदेखील त्यांनी स्वत:ला वाचनात गुंतवले आहे.  गोरगरिबांनाही ते सढळ हाताने मदत करतात. त्यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा शेती करतो. तर लहान मुलगा शिक्षक आहे. त्यांनी काल 5 हजाराची पुस्तके खरेदी केली. तसेच ते सर्वच स्टॉलला भेट देतात आणि एक तरी पुस्तक प्रत्येक स्टॉलवरुन विकत घेतात, असे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं. हेही वाचा - Pune: राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, धावपळीत महिला दरीत कोसळली प्रसिद्धी माध्यमांपासून दूर -  एकाने त्यांना साहित्य संमेलनात विचारलं की, इतकी पुस्तके खरेदी करतात तेव्हा घरचे काही बोलत नाही का, तर त्यांनी उत्तर दिलं की, माझ्यापुढे गाव काही बोलत नाही तर घरचे काय बोलणार, असे उत्तर त्यांनी दिले. आपण इतकी पुस्तके खरेदी करतो आणि ते वाचतो, याबाबत प्रसिद्धी करायला त्यांना आवडत नाहीत. नाशिक येथील साहित्य संमेलनात त्यांचा सत्कार होणार होता. मात्र, ते व्यासपीठावरही गेले नाहीत. तसेच त्यांना माध्यमांनाही मुलाखत दिली नाही. तर वाचनवेडे व्यक्तिमत्त्व विठ्ठलराव जानराव देशमुख यांच्यासंदर्भातील ही माहिती फेसबुकवर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Latur

  पुढील बातम्या