महत्त्वाची बातमी: आता करता येणार राज्यातल्या राज्यात प्रवास, सरकारची नवी नियमावली जाहीर

महत्त्वाची बातमी: आता करता येणार राज्यातल्या राज्यात प्रवास, सरकारची नवी नियमावली जाहीर

राज्यातल्या राज्यात प्रवास करण्यासाठी राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे.

  • Share this:

मुंबई, 1 मे:  राज्यात अडकलेल्या परराज्यातील मजूर, कामगार आणि विद्यार्थ्यांना परत त्यांच्या राज्यात पाठवण्यास सरकारने मंजुरी दिली. राज्याबाहेर कसं जाता येईल, याबाबत चाचपणी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे राज्यातल्या राज्यात प्रवास करण्यासाठी राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे.

जिल्हाधिकारी किंवा महापालिका आयुक्तांनी ठरवलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात (containment zone) कोणत्याही प्रकारची लोकांची वाहतूक होणार नाही. या झोनमध्ये कोणी आत येणार नाही किंवा कोणी बाहेर जाणार नाही. असं  नव्या नियमावलीत म्हटलं आहे.

डॉक्टरचं सर्टिफिकेट अनिवार्य...

जे कोणी प्रवास करणार आहेत त्यांच्याकडे डॉक्टरचं सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. 'व्यक्तीला फ्ल्यु किंवा फ्ल्युसारखा कोणताही आजारची लक्षण नाही. त्यांचे स्क्रिनिंग करण्याची गरज नाही.', असं सर्टिफिकेटमध्ये नमूद केलेलं असावं.

लॉकडाऊन वाढविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशवासियांशी संवाद साधणार

दुसरीकडे, मुंबईसह उपनगर, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये तर प्रत्येक बाबीची काटेकोरपणे काळजी घेतली जात आहे. या भागात जिल्हाधिकारी किंवा आयुक्त परवानगी देत नाही तोपर्यंत कोणीही या प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर जाऊ शकणार नाही.

त्याचबरोबर मालेगाव, सोलापूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर या हॉटस्पॉट विभागात कोणतीही प्रवासी वाहतूक होण्याआधी अतिदक्षता घेण्यात यावी, अशा शासनातर्फे सूचना देण्यात आल्या आहेत.

कोणते आहेत नवे नियम...

- नोडल अधिकाऱ्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या गंतव्यस्थानी तिथल्या नोडल अधिकाऱ्याला त्या प्रवाशांची माहिती देणे आवश्यक आहे.

- तिथला नोडल अधिकाऱ्याने परवानगी दिली की मग प्रवासाला सुरुवात होऊ शकते

-ई पास जे महाराष्ट्र पोलीस वापरतात ती सिस्टम आता नोडल अधिकारी पण बदल करून वापरू शकतात.

लॉकडाऊनमध्ये अडकलेले आपापल्या घरी जायचं असेल तर...

Coronavirus चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन सुरू झाला आणि हजारो परप्रांतीय कामगार अडकले. त्यांना गावी परतायाची इच्छा आहे पण बस, रेल्वेसेवा बंद असल्याने ते जाऊ शकले नाहीत. राज्यात अडकलेल्या परराज्यातील मजूर आणि विद्यार्थ्यांना परत त्यांच्या राज्यात पाठवण्यास सरकारने मंजुरी दिली आणि राज्याबाहेर कसं जाता येईल याची चाचपणी सुरू झाली आहे.

आणखी दोन आठवड्यांनी वाढला Lockdown

अद्याप कुठलीही बससेवा वा रेल्वेसेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे कामगारांनी वा मजुरांनी घाई करून गर्दी करू नये. आहेत त्याच ठिकाणी थांबावं असं आवाहन पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. आपल्या राज्यात जाऊ इच्छिणाऱ्या परप्रांतीयांची प्रशासनातर्फे यादी केली जाईल आणि योजनाबद्ध पद्धतीनेच त्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी या प्रक्रियेबद्दल खुलासा केला आहे.

जिल्हा प्रशासनाच्या पत्रानंतरच स्थलांतरणास परवानगी मिळणार असल्याचं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना सांगितलं आहे. तथापी स्थलांतरणासाठी इच्छूकांनी जाण्यासाठी घाई करु नये, तसेच घाबरुन जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

दरम्यान, राज्यात अडकलेल्या परराज्यातील मजूर आणि विद्यार्थ्यांना परत त्यांच्या राज्यात पाठवण्यास सरकारने मंजुरी दिली आणि राज्याबाहेर कसं जाता येईल याची चाचपणी सुरू झाली आहे. मात्र, अद्याप कुठलीही बससेवा वा रेल्वेसेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे कामगारांनी वा मजुरांनी घाई करून गर्दी करू नये. आहेत त्याच ठिकाणी थांबावं असं आवाहन पुण्याच्या जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केलं आहे. आपल्या राज्यात जाऊ इच्छिणाऱ्या परप्रांतीयांची प्रशासनातर्फे यादी केली जाईल आणि योजनाबद्ध पद्धतीनेच त्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रक्रियेबद्दल खुलासा केला आहे.

जिल्हाधिकारी यांच्या परवानगीचे पत्र असेल तरच अडकलेल्या नागरिकांना स्थलांतर करण्याची परवानगी दिली जाणार आहे. यानंतर या नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाईल. त्यानंतरच स्थलांतरनाची कार्यवाही सुरु केली जाईल. कामगारांच्या सर्व तक्रारींच्या निराकरणासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने 24 तास नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे. तक्रार असल्यास दुरध्वनी क्र.020-26111061 अथवा 020-26123371 अथवा 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा तसेच dcegspune1@gmail.com व controlroompune@gmail.com या इमेलवर तक्रारी स्विकारल्या जातील. याशिवाय तालुका नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राम यांनी दिली.

(संपादन/संकलन - संदीप पारोळेकर)

अन्य बातम्या

..अन्यथा परिस्थिती आणखी हाताबाहेर जाईल, या आमदाराने दिला राज्य सरकारला इशारा!

Coronavirus विरोधातील लसींची चाचणी, मात्र प्रत्यक्षात कधी उपलब्ध होणार लस?

First published: May 1, 2020, 7:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading