सत्तास्थापनेची सगळ्यात मोठी बातमी, मुख्यमंत्री मागे घेणार 'ते' विधान

सत्तास्थापनेची सगळ्यात मोठी बातमी, मुख्यमंत्री मागे घेणार 'ते' विधान

सेना- भाजपमधला तिढा सुटण्याची शक्यता आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावर एक मसुदा तयार होतोय. शिवसेना आणि भाजप यांच्यात अडीच - अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाबद्दल काहीही ठरलेलं नव्हतं, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यांच्या या विधानाला शिवसेनेने आक्षेप घेतला होता.

  • Share this:

मुंबई, 8 नोव्हेंबर : सेना- भाजपमधला तिढा सुटण्याची शक्यता आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावर एक मसुदा तयार होतोय. शिवसेना आणि भाजप यांच्यात अडीच - अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाबद्दल काहीही ठरलेलं नव्हतं, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यांच्या या विधानाला शिवसेनेने आक्षेप घेतला होता. यावर आता भाजपकडून स्पष्टीकरण देण्यात येतंय. शिवसेनेला या वक्तव्याबदद्लची लेखी दिलगिरी हवी आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.

मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात बैठक होतेय. त्यानंतर दुपारी साडेचार वाजता मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार आहेत.

सत्तास्थापनेसाठीची मुदत उद्या, 9 नोव्हेंबरला संपतेय. त्यामुळेच सरकार स्थापन करण्याच्या या घडामोडींना वेग आला आहे.

शिवसेना भूमिकेवर ठाम

याआधी, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज सेनाभवनात एक महत्त्वाची बैठक घेतली. शिवसेना मुख्यमंत्रिपदावर ठाम आहे या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. आम्हाला मुख्यमंत्रिपदाचं पत्र हवं आहे, मसुदा नको, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. त्यामुळे आता शिवसेना वाटाघाटींसाठी तयार होते का, सत्तास्थापनेची ही कोंडी फुटू शकते का याची उत्तरं मिळण्यासाठी वाट पाहावी लागेल. उद्धव ठाकरे संध्याकाळी 5 वाजता रंगशारदामध्ये शिवसेनेच्या आमदारांची भेट घेणार आहेत. त्या बैठकीकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

=============================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2019 03:41 PM IST

ताज्या बातम्या