मुंबई, 4 जानेवारी : राज्य मंत्रिमंडळाच्या खाते आज वाटप होण्याची शक्यता आहे. खातेवतपावरून महाआघाडी सरकारमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मात्र शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता होताना दिसत नव्हती. मात्र आता अखेर काँग्रेसला चार वाढीव खाती दिल्यानंतर आज काँग्रेसची यादी दिल्लीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे येणं अपेक्षित आहे.
खातेवाटपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची शुक्रवारी रात्री बैठक झाली. राष्ट्रवादीच्या या बैठकीत पक्षाच्या वाट्याला आलेल्या खात्यांच्या वाटणीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ही एकत्रित यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्यानंतर त्याला राज्यपाल यांची मान्यता घेतली जाईल. त्यानंतर आज दुपारपर्यंत खातेवाटपाची घोषणा होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
पालकमंत्रिपदाचा फॉर्म्युलाही ठरला
एकीकडे खातेवाटपावरून महाविकास आघाडीत तिढा असताना पालकमंत्रिपदाच्या वाटणीवरूनही रस्सीखेच सुरू होती. मात्र आता तीनही पक्षांनी पालकमंत्रिपदाबाबतचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. पालकमंत्र्यांचा फॉर्म्युला 14-12-10 हा असण्याची शक्यता आहे. शिवसेना 14, राष्ट्रवादी 12, काँग्रेसचे 10 अशी वाटणी करण्यात आली. आमदारांच्या संख्याबळानुसार पालकमंत्री प्रत्येक पक्षाला मिळणार आहेत.
भाजपच्या गोटातून मोठी बातमी, खडसेंसह पंकजा मुंडेही होणार आमदार
पालकमंत्रिपदावरूनही वाद होते मात्र ते मिटविण्यात आले आहेत. स्थानिक प्रश्न सोडविण्यात पालमंत्र्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे बालेकिल्ला असलेल्या जिल्हा आपल्याला मिळावा, यासाठी तीनही पक्षांची चढाओढ होती.
असं असेल पालकमंत्र्यांचं संभाव्य खातेवाटप
नगर - बाळासाहेब थोरात
ठाणे - एकनाथ शिंदे
पुणे - अजित पवार
नांदेड - अशोक चव्हाण
बुलढाणा - राजेंद्र शिंगणे
जालना - राजेश टोपे
चंद्रपूर - विजय वेदट्टीवर
लातूर - अमित देशमुख
रत्नागिरी -उदय सामंत
धुळे - दादा भुसे
यवतमाळ - संजय राठोड
जळगाव - गुलाबराव पाटील
नंदुरबार - के सी पाडावी
औरंगाबाद - संदीपन भुमरे
सिंधुदुर्ग - अनिल परब
अमरावती - यशोमती ठाकूर
मुंबई शहर - आदित्य ठाकरे
मुंबई उपनागर -अस्लम शेख
बीड - धनंजय मुंडे
सांगली - जयंत पाटील
नागपूर - नितीन राऊत
नाशिक - छगन भुजबळ
रायगड - सुभाष देसाई/ अदिती तटकरे
सातारा - बाळासाहेब पाटील
कोल्हापूर - हसन मुश्रीफ
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.