Home /News /maharashtra /

पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास योग्य दिशेने, पोलीस महासंचालकांनी केले स्पष्ट

पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास योग्य दिशेने, पोलीस महासंचालकांनी केले स्पष्ट

'पोलिसांचा तपास हा जर तर वर चालत नाही. ही आत्महत्येची घटना आहे'

    नागपूर, 25 फेब्रुवारी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून (pooja chavan suicide case) राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पुणे पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप भाजपने केला आहे. मात्र, पोलिसांवर कोणताही दबाव नसून तपास योग्य दिशेनं सुरू आहे, असं पोलीस महासंचालक हेमंत नगराळे (hemant nagrale) यांनी स्पष्ट केले. पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या मुद्यांवर आपली भूमिका मांडली. 'पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव आहे का? असे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांना विचारले असता. 'पोलिसांचा तपास हा जर तर वर चालत नाही. आत्महत्येची घटना आहे. तथ्यांच्या आधारावर पुणे पोलीस तपास करत आहे' असे हेमंत नगराळे यांनी सांगितले. तसंच, 'पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलीस तपास योग्य दिशेने आहे. या प्रकरणात मी प्रसार माध्यमांसमोर भाष्य करणार नाही. पुणे पोलिसांकडून योग्य तपास सुरू आहे', असंही नगराळे यांनी स्पष्ट केले. पोहरागड गर्दी संदर्भात संजय राठोड यांच्यावर गुन्हे दाखल होईल का? हा प्रश्न पोलीस महासंचालकांना विचारला असता या वर भाष्य करायला त्यांनी नकार दिला.. 'नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर गुन्हे दाखल झाले आहे. तपासात पुढे जे येईल त्यानुसार कारवाई केली जाईल' असं नगराळे म्हणाले. पोलीस विभागातील शंभर टक्के भ्रष्ट्राचार कधीच थांबणार नाही. इतर विभागाच्या तुलनेने पोलिसांची संख्या जास्त असल्याने पोलीस विभागात भ्रष्टचारात आघाडीवर दिसतो, त्यावर तोडगा काढला जाईल, असंही नगराळे म्हणाले. राज्यात 20 हजार पोलिसांच्या जागा भरायच्या आहे. दोन टप्प्यात भरती प्रक्रिया राबवली जाईल. पुढच्या एक ते दोन महिन्यात पहिल्या टप्यातील 7 हजार पोलिसांची भरती केली जाईल. त्यानंतर उर्वरित भरती प्रक्रिया राबवली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. आज मी नागपूर शहर व नागपूर परिक्षेत्राचा आढावा घेत आहे. ऑन ड्युटी मृत्यू झालेल्या पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अनुकंप तत्वावर नोकरी देण्याची प्रक्रिया सुरू आहे, असंही त्यांनी सांगितले.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: BJP, Modi government, Mumbai News, Pooja Chavan, Pune, Sanjay rathod, Suicide

    पुढील बातम्या