मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा नवा खुलासा, अरुण राठोड कुटुंबीयांसोबत झाला गायब

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा नवा खुलासा, अरुण राठोड कुटुंबीयांसोबत झाला गायब


पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयित मंत्री आणि अरुण राठोड यांच्यात झालेल्या संवाद व्हायरल झाले आहेत.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयित मंत्री आणि अरुण राठोड यांच्यात झालेल्या संवाद व्हायरल झाले आहेत.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयित मंत्री आणि अरुण राठोड यांच्यात झालेल्या संवाद व्हायरल झाले आहेत.

परळी, 14 फेब्रुवारी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे (Pooja Chavan suicide case) राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे (Shivsena) मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर या प्रकरणी गंभीर आरोप होत आहे. तर दुसरीकडे पूजा चव्हाणच्या भावासोबत राहत असणार अरुण राठोड (Arun Rathod) हा आपल्या कुटुंबीयांसोबत गायब झाल्याचे समोर आले आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयित मंत्री आणि अरुण राठोड यांच्यात झालेल्या संवाद व्हायरल झाले आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये दोघांच्या संवादाची जोरदार चर्चा रंगली असून विरोधकांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. पण, या ऑडिओ क्लिपमध्ये ज्या अरुण राठोडचा आवाज आहे तो अरुण राठोड हा पूजा चव्हाण हिच्या भावांसोबत एकाच घरात राहत होता. न्यूज 18 लोकमतची टीम अरुणच्या घरी पोहोचली तेव्हा घराला कुलुप होते. संपूर्ण कुटुंब हे गेल्या काही दिवसांपासून गायब आहे.

2.8 लाख लोकांना मिळेल रोजगार, ही परदेशी कंपनी भारतात लवकरच सुरू करणार युनिट

ऑडिओ क्लिप व्हायरल झाली तसा अरुण राठोड हा आपल्या कुटुंबासोबत गायब आहे. अरुण राठोड प्रकरणातील महत्वाचा धागा असल्याने त्यांच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या जीविताला धोका असल्याचे अरुण राठोड याचा नातेवाईकांचे म्हणणे आहे.

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी आतापर्य़ंत काय आणि कधी घडलं?

रविवार, 7 फेब्रुवारी- पूजा चव्हाण नावाच्या एका टिकटॉक स्टारची आत्महत्या झाल्याची बातमी समोर आली. तिने वानवडीतील हेवन पार्क सोसायटीच्या बाल्कनीतून उडी घेवून जीव दिला. त्यानंतर हे प्रकरण पाच दिवस शांत होतं.

शुक्रवारी - 12 फेब्रुवारी - वानवडी पोलिसांना मृत पूजा चव्हाण मृत्यूशी संबंधित काही ध्वनीफिती मिळाल्या. ज्यामध्ये दोन पुरूषांचा आवाज होता. यावरुन कळालं की, पूजाच्या आत्महत्या करणार असल्याची माहिती अगोदर काही लोकांना होती. त्यानंतर या ध्वनीफिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहे आणि प्रकरण पेटत गेलं.

- पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात महाविकास आघाडीच्या एका नेत्याचा हात असल्याचा दावा सोशल मीडियात करण्यात आला.

- महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीची मागणी केली.

Valentine's Day: विकीसोबत रोमँटिक व्हॅकेशनवर गेली अंकिता, फोटो केला शेअर

12 फेब्रुवारी- भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत करत कारवाईची मागणी केली. यावेळी त्यांनी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं. त्यानंतर प्रकरण वाढत गेलं. अनेक माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरला.

13 फेब्रुवारी- पूजा चव्हाण हिचा पोस्टमॉर्टेम रिपोर्टही समोर आला आहे. यानुसार पूजाच्या डोक्यावर आणि मणक्याला जखम असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. इमारतीवरुन पडल्यानंतर तिच्या डोक्यावर व मणक्याला मार लागला व त्यात तिचा मृत्यू झाला, असं सांगण्यात आलं. मात्र हा अपघात होता की आत्महत्या की घातपात याचा नेमका खुलासा झालेला नाही.

13 फेब्रुवारी - पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेत महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवली. या आत्महत्या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच पुणे पोलीस आयुक्तांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे.

13 फेब्रुवारी - पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडलं आणि चौकशीचं आश्वासन दिलं. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, जे सत्य आहे ते बाहेर येईलच. त्यानंतर ज्यांच्यावर कारवाईची गरज आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या संदर्भात सखोल चौकशी केली जाईल. पण गेले काही दिवस काही महिने. एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्नं केला जातोय. असाही प्रयत्नं होता कमा नये आणि सत्यही लपवण्याचा प्रयत्न होता कामा नये,'

IND vs ENG : एकाच सत्रात 8 विकेट, खेळपट्टीने केली रंग दाखवायला सुरूवात

13 फेब्रुवारी - पूजाने आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडली, असा दावा तिच्यासोबत असणाऱ्या दोन मित्रांनी केला आहे.

13 फेब्रुवारी- मृत पूजा चव्हाणची छोटी बहिण दिया चव्हाणचे इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, माझी बहिण वाघिण होती, ती असं करू शकत नाही. जर तिने आत्महत्येचा निर्णय घेतला असेल तर त्यात नक्कीच मोठं कारण असेल.

First published:
top videos