संजय राठोड यांच्या अडचणी वाढवण्यासाठी भाजपची रणनीती तयार

संजय राठोड यांच्या अडचणी वाढवण्यासाठी भाजपची रणनीती तयार

पूजा चव्हाणच्या आत्महत्येचं प्रकरण झाल्यानंतर तब्बल 19 दिवसांनी भारतीय जनता पक्ष आंदोलन करणार आहे.

  • Share this:

मुंबई, 26 फेब्रुवारी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भारतीय जनता पक्षाने आता आक्रमक पद्धतीने राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचा महिला मोर्चा, युवा मोर्चा आणि ओबीसी मोर्चा आता रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येचं प्रकरण झाल्यानंतर तब्बल 19 दिवसांनी भारतीय जनता पक्ष आंदोलन करणार आहे.

पक्षाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी यापूर्वीच आक्रमक भूमिका घेतली आहे आणि त्यानंतर आता पक्षाच्या इतर संघटनाही या प्रकारेच सरकारविरोधात हल्लाबोल करणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा शनिवारी राज्यभरात चक्का जाम आंदोलन करणार आहेत. महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे या स्वतः उद्या मुलुंड येथे चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी होतील.

वन मंत्री संजय राठोड यांनी पूजा चव्हाण प्रकरणात राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आलेली आहे. मात्र तूर्तास तरी वनमंत्री राठोड यांनी राजीनामा दिलेला नाही आणि म्हणूनच भाजप शनिवारी राज्यभर आंदोलन करणार आहे. त्यासोबतच 1 मार्चला भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे अशी घोषणाा करण्यात आली आहे.

भाजपा ओबीसी मोर्चा 3 मार्चला राज्यभर चौकाचौकात आसूड आंदोलन करणार आहे. पोहरादेवी इथं शक्तिप्रदर्शन करताना

राठोड यांनी आपण बहुजन समाजातील आहोत म्हणून आपल्यावर अन्याय केला जात आहे, आपल्या विरोधात राजकारण केले जात आहे असा दावा संजय राठोड यांनी केला होता.

या पार्श्वभूमीवर आता भाजप ओबीसी मोर्चाही संजय राठोड यांच्या विरोधात आंदोलन करणार आहे. यापूर्वीच पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी पुणे पोलीस दबावाखाली काम करत आहे आणि संजय राठोड यांचा बचाव करत आहे असा आरोप केला होता. त्यानंतर आता भाजपच्या आंदोलनाने पुन्हा एकदा हा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे.

Published by: Akshay Shitole
First published: February 26, 2021, 11:17 PM IST

ताज्या बातम्या