मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणाऱ्या TikTok स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणात आतापर्यंत काय झालं?

महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणाऱ्या TikTok स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणात आतापर्यंत काय झालं?

गेल्या रविवारी (7 फेब्रुवारी) पूजा चव्हाण नावाच्या एका TikTok वर प्रसिद्ध असणाऱ्या तरुणीचा (Pooja chavan) मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसात एक ऑडिओ क्लिप समोर आली आणि पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी नवनवे खुलासे होत गेले.

गेल्या रविवारी (7 फेब्रुवारी) पूजा चव्हाण नावाच्या एका TikTok वर प्रसिद्ध असणाऱ्या तरुणीचा (Pooja chavan) मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसात एक ऑडिओ क्लिप समोर आली आणि पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी नवनवे खुलासे होत गेले.

गेल्या रविवारी (7 फेब्रुवारी) पूजा चव्हाण नावाच्या एका TikTok वर प्रसिद्ध असणाऱ्या तरुणीचा (Pooja chavan) मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसात एक ऑडिओ क्लिप समोर आली आणि पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी नवनवे खुलासे होत गेले.

पुणे, 14 फेब्रुवारी:  गेल्या रविवारी (7 फेब्रुवारी) रोजी पूजा चव्हाण नावाच्या एका टीकटॉक स्टार पुण्यातील वानवडी परिसरातील एका इमारतीच्या बाल्कनीतून उडी घेवून आत्महत्या केली. त्यांनतर हे प्रकरण पाच दिवस शांत झालं. पण 12 फेब्रुवारीला काही ध्वनीफिती पोलिसांच्या हाती लागल्या आहे आणि प्रकरण वाढत गेलं. याप्रकरणामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. तर विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. या प्रकरणात अनेक खुलासे करण्यात आले आहेत. जाणून घेवूयात याप्रकरणाचा सविस्तर घटनाक्रम...

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी आतापर्य़ंत काय आणि कधी घडलं (Pooja Chavan death case Time Line)

रविवार, 7 फेब्रुवारी- पूजा चव्हाण नावाच्या एका टिकटॉक स्टारची आत्महत्या झाल्याची बातमी समोर आली. तिने वानवडीतील हेवन पार्क सोसायटीच्या बाल्कनीतून उडी घेवून जीव दिला. त्यानंतर हे प्रकरण पाच दिवस शांत होतं.

शुक्रवारी - 12 फेब्रुवारी - वानवडी पोलिसांना मृत पूजा चव्हाण मृत्यूशी संबंधित काही ध्वनीफिती मिळाल्या. ज्यामध्ये दोन पुरूषांचा आवाज होता. यावरुन कळालं की, पूजाच्या आत्महत्या करणार असल्याची माहिती अगोदर काही लोकांना होती. त्यानंतर या ध्वनीफिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहे आणि प्रकरण पेटत गेलं.

- पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात महाविकास आघाडीच्या एका नेत्याचा हात असल्याचा दावा सोशल मीडियात करण्यात आला.

- महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीची मागणी केली.

12 फेब्रुवारी-दुपारी 1.34 - भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत करत कारवाईची मागणी केली. यावेळी त्यांनी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं. त्यानंतर प्रकरण वाढत गेलं. अनेक माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरला.

13 फेब्रुवारी- 6 pm पूजा चव्हाण हिचा पोस्ट मॉर्टेम रिपोर्टही समोर आला आहे. यानुसार पूजाच्या डोक्यावर आणि मणक्याला जखम असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. इमारतीवरुन पडल्यानंतर तिच्या डोक्यावर व मणक्याला मार लागला व त्यात तिचा मृत्यू झाला, असं सांगण्यात आलं. मात्र हा अपघात होता की आत्महत्या की घातपात याचा नेमका खुलासा झालेला नाही.

13 फेब्रुवारी 7.10 pm पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेत महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवली. या आत्महत्या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच पुणे पोलीस आयुक्तांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे.

13 फेब्रुवारी 7.20 pm- पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडलं आणि चौकशीचं आश्वासन दिलं. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, जे सत्य आहे ते बाहेर येईलच. त्यानंतर ज्यांच्यावर कारवाईची गरज आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या संदर्भात सखोल चौकशी केली जाईल. पण गेले काही दिवस काही महिने...एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्नं केला जातोय...असाही प्रयत्नं होता कमा नये आणि सत्यही लपवण्याचा प्रयत्न होता कामा नये,'

13 फेब्रुवारी 7.30 pm - पूजाने आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडली, असा दावा तिच्यासोबत असणाऱ्या दोन मित्रांनी केला आहे.

13 फेब्रुवारी- मृत पूजा चव्हाणची छोटी बहिण दिया चव्हाणचे इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, माझी बहिण वाघिण होती, ती असं करू शकत नाही. जर तिने आत्महत्येचा निर्णय घेतला असेल तर त्यात नक्कीच मोठं कारण असेल.

First published:

Tags: Crime news, Maharashtra