मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर आणखी एक VIDEO झाला लीक; संजय राठोड यांच्याशी संबंध असल्याचा दावा

पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर आणखी एक VIDEO झाला लीक; संजय राठोड यांच्याशी संबंध असल्याचा दावा

वनमंत्री संजय राठोड पोहरादेवी दर्शनाच्या निमित्ताने 15 दिवसांनी प्रथमच माध्यमांसमोर त्यांची बाजू मांडायला अकारण गोवण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला असतानाच आणखी एक VIDEO लीक झाला आहे.

पुणे, 23 फेब्रुवारी: Tiktok स्टार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. या प्रकरणात नाव आल्यानंतर पहिल्यांदाच वनमंत्री संजय राठोड यांनी त्यांची बाजू मंगळवारी मांडली. पोहरादेवी दर्शनाच्या निमित्ताने ते 15 दिवसांनी प्रथमच माध्यमांसमोर आले. या प्रकरणी अकारण गोवण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला असतानाच आणखी एक VIDEO लीक झाला आहे.

हा मोबाईल व्हीडिओ संजय राठोड यांच्यासाठी बनवला असल्याचा दावा करण्यात येतो आहे. पूजाच्या लॅपटॉमध्ये हा व्हिडीओ सापडल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. संजय राठोड यांचा फोटो या व्हिडीओमध्ये दिसतो. तुझपे ही तो मेरा हक है, अशा गाण्याच्या ओळी असणाऱ्या या VIDEO ची सत्यता अद्याप तपासण्यात आलेली नाही.

Laptop मध्ये संजय राठोड यांच्यासाठी बनवलेला हा VIDEO होता, असा दावा करण्यात येत आहे. पूजा चव्हाण ही छोटे VIDEO तयार करून सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी प्रसिद्ध होती. ती TikTok स्टार होती. तिच्या मृत्यूनंतर गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणात तब्बल 12 ऑडिओ क्लीप समोर आल्या आहेत. या क्लिप्सवरून विरोधकांनी ठाकरे सरकारवर आगपाखड करण्यास सुरू केली आहे. तिच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लिप्समधल्या संवादावरून तिचे कथित मंत्र्यांशी प्रेमसंबंध असल्याचा संशय निर्माण झाला आहे.

पाहा - ऑ 'मला राँग बॉक्समध्ये उभे करू नका', संजय राठोड यांची हात जोडून विनंती

या ऑडिओ क्लिप राजकीय कार्यकर्ता अरुण आणि संबंधित शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यातील असल्याचा आरोप विरोध पक्षांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे.

या क्लीप नेमक्या कशा बाहेर आल्या याबाबत विचारणा केली जात आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळीच भाजपच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने अरूण राठोडकडून या ऑडिओ क्लीप काढून घेतल्याचं समोर येत आहे.

कोण होती पूजा चव्हाण?

पूजा चव्हाण ही बीड जिल्ह्यातील परळी येथील तरुणी आहे. ती एक टीकटॉक स्टार होती. सोशल मीडियावर तिचे बरेच चाहते आहेत. पूजाला तिच्या समाजासाठी मोठं काम करायचं होतं. त्यासाठी पूजा विविध सामाजिक कामांत सहभाग घेत असत. तिला बंजारा समाजाच्या विकासासाठी काहीतरी भरीव कामगिरी करायची होती, ही बाब तिने अनेकदा आपल्या व्हिडीओमधून बोलून दाखवली होती.

First published:

Tags: Pooja Chavan, Pune, Sanjay rathod