मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pooja Chavan आत्महत्या प्रकरणानंतर संजय राठोड पहिल्यांदाच लोकांसमोर येणार, खुलासा करणार?

Pooja Chavan आत्महत्या प्रकरणानंतर संजय राठोड पहिल्यांदाच लोकांसमोर येणार, खुलासा करणार?

संजय राठोड उद्या सकाळी 9 वाजता पोहरादेवीच्या दर्शनासाठी निघणार आहे

संजय राठोड उद्या सकाळी 9 वाजता पोहरादेवीच्या दर्शनासाठी निघणार आहे

संजय राठोड उद्या सकाळी 9 वाजता पोहरादेवीच्या दर्शनासाठी निघणार आहे

  • Published by:  Meenal Gangurde

वाशिम, 22 फेब्रुवारी : पूजा चव्हाण प्रकरणामुळे चर्चेत असलेले राज्याचे वन, भूकंप  पुनर्वसन मंत्री संजय राठोड हे उद्या 23 फेब्रुवारी रोजी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर  असल्याची माहिती समोर आली आहे. 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता ते क्षेत्र पोहरागड येथे भेट देणार आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. उद्या ते पूजा चव्हाण प्रकरणाबाबत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण देतील, शिवाय समर्थकांसमोर त्यांच्यावरील आरोपांबाबत खुलासा करणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

संजय राठोड यवतमाळ येथे त्यांच्या घरी आहेत, असा दावा केला जात आहे. उद्या ते घरातून 9 वाजता पोहरादेवीच्या दर्शनासाठी निघणार आहे. साधारण 80 किमी अंतरावर असलेल्या पोहरादेवीच्या दर्शनासाठी संजय राठोड यांच्या सोबत कुटुंबीय व स्थानिक नेतेही असणार आहेत. पोहोरादेवी येथे त्यांचे शक्ती प्रदर्शन नसेल असं सांगितलं जात आहे, मात्र तरीही समर्थक गर्दी करण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा-कोरोनाचा विळखा आणि लॉकडाऊनची पकड आणखी घट्ट; कुठल्या जिल्ह्यात आहे संचारबंदी?

गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणात तब्बल 12 ऑडिओ क्लीप समोर आल्या आहेत. या क्लीपवरुन विरोधकांनी ठाकरे सरकारवर आगपाखड करण्यास सुरू केली आहे. या प्रकरणात शिवसेना नेते संजय राठोड यांचा संबंध असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. या प्रकरणात ऑडिओ क्लीप हे महत्त्वपूर्ण पुरावे मानले जात आहे.

दरम्यान या ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून व्हायरल झाल्या आहेत. त्यातून या क्लीप नेमक्या कशा बाहेर आल्या याबाबत विचारणा केली जात आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळीच भाजपच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने अरूण राठोडकडून या ऑडिओ क्लीप काढून घेतल्याचं समोर येत आहे. तसेच त्याचवेळी त्यांच्या फोटो आयडीचे फोटो काढून घेतल्याचं सांगितलं जात आहे. पण या प्रकरणी आता दबाव एवढा वाढू लागला आहे. याशिवाय ज्या कार्यकर्त्याने या क्लीप अरूण राठोडकडून घेतल्या तोदेखील आता माध्यमांसमोर येण्याचं टाळत आहे.

First published:

Tags: Pooja Chavan, Sanjay rathod