मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'राजकारण असंच असतं' एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांना सणसणीत टोला

'राजकारण असंच असतं' एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांना सणसणीत टोला


गिरीश महाजन यांना कोणी ओळखत नव्हतं मी मोठे त्यांना केलं. जामनेर मतदार संघ शिवसेनेचा होता

गिरीश महाजन यांना कोणी ओळखत नव्हतं मी मोठे त्यांना केलं. जामनेर मतदार संघ शिवसेनेचा होता

आपल्यामुळे महापौर बदलला असा धक्कादायक दावा खडसे यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

  • Published by:  sachin Salve

जळगाव, 27 नोव्हेंबर :  'जिल्हा बँक निवडणुकीत (Jalgaon District Bank Election) माजी मंत्री गिरीश महाजन (girish mahajan) पैसे लावतील म्हणून त्यांनी 10 कोटी लावले तर मी 20 कोटी लावेल, नाथाभाऊ बसला आहे तुम्ही फक्त लढा असं म्हणत  इच्छुक असणाऱ्यांना जिल्हा बँकांची निवडणूक लढायला लावली. राजकारण हे असच असतं आम्ही काही धर्मार्थ दवाखाना थोडी सुरू केला' असं म्हणत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी गिरीश महाजनांना टोला लगावला आहे. तसंच, आपल्यामुळे महापौर बदलला असा धक्कादायक दावा खडसे यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

जळगाव येथे राष्ट्रवादी कार्यालयात कार्यकर्त्यांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवरून गिरीश महाजन आणि भाजपवर निशाणा साधला.

'मी दवाखान्यात असतांना सुद्धा जिल्हा बँकेत एकही भाजपचा निवडून येवू देणार नाही हा शब्द दिला होता. आणि योग्य वेळी शेवटच्या दिवशी फॉर्म भरायला सुरुवात केली आणि विजय मिळवला, असल्याचेही एकनाथ खडसे म्हणाले.

स्टार लोकांना लुबाडणारी शिल्पा, तब्बल 100 कोटींपेक्षाही मोठी फसवणूक

माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा बँके निवडणुकीत विश्वासघात केल्याच्या आरोप केला होता. याबाबत उत्तर देतांना एकनाथ खडसे म्हणाले की, 'राजकारण हे असच असतं आम्ही काही धर्मार्थ दवाखाने नाही चालवत. जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांनी 21 उमेदवार उभे करण्याची तयारी ठेवली' असा टोला त्यांनी गिरीश महाजन यांना लगावला.

तसंच, 'जळगाव महानगर पालिकेत नाथाभाऊने धक्का दिला म्हणून तिथे महापौर बदलला' असा दावाही खडसेंनी केला.

मात्र जिल्हा निवडणूक बँक प्रकरणी सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या दोन बैठकी व त्यानंतर राष्ट्रवादी व काँग्रेसच्या यू-टर्न घेतल्यामुळे भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला होता. या आरोपावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, 'राजकारण हे असंच असतं, आम्ही काही धर्मार्थ दवाखाने चालवत नाही' असं म्हणत  खडसेंनी गिरीश महाजन यांना टोला लगावला.

IND vs NZ : मुंबईतल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला धक्का, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

तर दुसरीकडे जळगाव महानगरपालिकेत महापौर आपल्यामुळे बदलला असल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. मात्र महानगरपालिकेत भाजपची एक हाती सत्ता मोडून शिवसेनेने सत्ता काबीज केली. त्यामुळे शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी भाजपला सुरूंग लावण्याचे म्हटलं जात आहे.

First published:

Tags: Eknath khadse