गुजरातमुळे राज्यात राजकीय हालचालींना वेग; भाजप नेत्यांचा 'क्लास' तर विरोधकांची मोर्चेबांधणी 

गुजरातमुळे राज्यात राजकीय हालचालींना वेग; भाजप नेत्यांचा 'क्लास' तर विरोधकांची मोर्चेबांधणी 

भाजप आमदार आणि मंत्र्यांचा आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघात क्लास सुरू आहे. या क्लाससाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पोहोचलेत. फक्त दोन आमदार गैरहजर आहेत.

  • Share this:

20 डिसेंबर: गुजरातच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.2019ची मोर्चेबांधणी करायची तयारी त्यांनी सुरू केली आहे. तर दुसरीकडे भाजप आमदार आणि मुख्यमंत्र्यांचा संघ मुख्यालयात क्लास घेतला जातोय.

गुजरातमध्ये भाजपला 100 चा आकडाही पार करता आलेला नाही. तर काँग्रेसच्या जागांमध्ये विलक्षण वाढ झाली आहे.त्यामुळे भाजपच्या वाढत्या प्रभावामुळे धास्तावलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी 2019 साली होणाऱ्या राज्यातील निवडणुकांसाठी नवे बळ संचारलं आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आतापासूनच नेतृत्वाकडे तगादा लावला आहे. समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली आहे. 2019 साठी आतापासूनच वाटाघाटी करून कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र यावं अशी गरज व्यक्त केली जाते आहे. दोन्ही पक्षांच्या आमदारांकडून एकत्र येण्याचा आग्रह केला जातो आहे. गरज पडल्यास कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि शरद पवारांची भेट घेणार आहेत.

तर दुसरीकडे भाजप आमदार आणि मंत्र्यांचा आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघात क्लास सुरू आहे. या क्लाससाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पोहोचलेत. फक्त दोन आमदार गैरहजर आहेत. ते म्हणजे सध्या नाराज असलेले आशिष देशमुख आणि माजी मंत्री एकनाथ खडसे. भाजपचे सर्व आमदार या मार्गदर्शन सत्रासाठी उपस्थित आहेत. भाजपचे सर्व आमदार संघाच्या नागपूरमधल्या मुख्यालयात आलेत. तिथे हेडगेवार स्मृतीमंदिरात हे सत्र सुरू आहे. विदर्भ क्षेत्र कार्यवाह दीपक तामशेट्टीवार आमदारांना मार्गदर्शन करत आहेत.

त्यामुळे आता राज्यात येत्या दोन वर्षात काय राजकीय घडामोडी होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 20, 2017 11:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading