सांगली पालिकेत राजकीय नाट्य, भाजपचे 7 नगरसेवक नॉट रिचेबल!

सांगली पालिकेत राजकीय नाट्य, भाजपचे 7 नगरसेवक नॉट रिचेबल!

सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या सत्तेचा फैसला आज होणार आहे.

  • Share this:

सांगली, 23 फेब्रुवारी : सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या सत्तेचा फैसला आज होणार आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून चालू असलेल्या राजकीय नाट्यावर आज पडदा पडण्याची शक्यता आहे. भाजपचे सात नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागल्याची चर्चा सांगली जिल्ह्यात आहे.

सांगली महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक आज होणार असून भाजपकडे असणारी ही महापालिका काँग्रेस राष्ट्रवादी कडे जाणार का याकडे संपूर्ण दक्षिण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मात्र, भाजपचे सात नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागल्याची चर्चा सांगली जिल्ह्यात आहे. सातही नगरसेवक नॉट रिचेबल आहे. कुणाशीही संपर्क होत नाहीये. हे सर्व नगरसेवक अजूनही बाहेरच आहे. मात्र, भाजपने सर्व नगरसेवक हे भाजपसोबतच असल्याचा दावा केला आहे. तर काँग्रेसमध्येही हालचालींना वेग आला आहे. नाराज असलेल्या नऊ नगरसेवकांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करण्यात आले असून यात यश आले आहे. त्यामुळे महापालिकेत आघाडीची सत्ता येणार का याची जोरदार चर्चा आहे.

सध्या सांगली महापालिकेत भाजपचे 43 काँग्रेसचे 19 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 15 नगरसेवक आहेत. तरीही महापौरपदासाठी राष्ट्रवादीच पारड सध्या जड आहे दरम्यान या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री विश्वजित कदम या सगळ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज ऑनलाईन पद्धतीने नगरसेवक मतदान करणार असून निकाल काय लागणार याकड संपूर्ण दक्षिण महाराष्ट्राच लक्ष लागले आहे.

Published by: sachin Salve
First published: February 23, 2021, 11:34 AM IST
Tags:

ताज्या बातम्या