देशातलं वातावरण बदलाला अनुकूल-शरद पवारांनी दिले संकेत

देशातलं वातावरण बदलाला अनुकूल-शरद पवारांनी दिले संकेत

या पत्रकार परिषदेत उदयन राजेंपासून ते राहुल गांधींपर्यंत सर्वच विषयांवर खास पवार शैलीत मिश्किल भाष्य केलं

  • Share this:

09 मे : आज साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.या परिषदेत देशातलं वातावरण बदलाला अनुकूल असल्याचा संकेत शरद पवारांनी दिला आहे.

या पत्रकार परिषदेत उदयन राजेंपासून ते राहुल गांधींपर्यंत सर्वच विषयांवर खास पवार शैलीत मिश्किल भाष्य केलं. तसंच कर्नाटकात काँग्रेसला वातावरण असल्याचंही शरद पवारांनी सांगितलं. त्यालाच जोडून या बदलाचं सुतोवाच त्यांनी केलं. पण असं असलं तरी सत्तेत पोचण्याइतपत जागा मिळतील का याबाबत मात्र साशंकता त्यांनी व्यक्त केली आहे.

छगन भुजबळ यांना मिळालेल्या जामिनावर मी आनंदी आहे. पण ज्या वेळी ते निर्दोष सुटतील यावेळी मोठा आनंद होईल, असंही शरद पवार म्हणाले. तसंच राहुल गांधीं पंतप्रधानपदाबाबत पवारांना विचारलं असता त्यांनी बाजारात तुरी या मराठी म्हणीचा संदर्भ देत एकप्रकारे राहुल गांधींची खिल्लीच उडवली.

First published: May 9, 2018, 5:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading