संतापजनक! अंगावर पेट्रोल टाकून पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला, सोलापूर जिल्ह्यातील घटना

संतापजनक! अंगावर पेट्रोल टाकून पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला, सोलापूर जिल्ह्यातील घटना

माळशिरस तालुक्यातील वेळापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचार्‍याला मळोली येथे मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

  • Share this:

माळशिरस, 29 एप्रिल : कोरोनाच्या प्रादुर्भावापासून नागरिकांना कोणता धोका निर्माण होऊ नये, यासाठी डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस सरंक्षण करणाऱ्या पोलिसांवर हल्ले होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अशातच माळशिरस तालुक्यातील वेळापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचार्‍याला मळोली येथे मारहाण झाल्याची घटना घडली आहे. जावेद नजीर जमादार असे मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

'कोरोना' रोगाच्या पार्श्वभूमीवर वेळापूर पोलीस स्टेशनचा साळमुख बिट अंमलदारास मदतनीस म्हणून नेमणूकीस असलेले कर्मचारी जावेद नजीर जमादार हे मळोली गावामध्ये पेट्रोलिंग करत असताना आरोपी अरुणसिंह फत्तेसिंह जाधव (रा. मळोली) याने कारमधून येऊन जातीवाचक शिवीगाळ केली.

तसंच काही दिवसांपूर्वी साळमुख येथील भावाचे हॉटेल चेक केल्याचा राग मनात धरून 28 एप्रिल रोजी रात्री 9 च्या सुमारास मळोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वारासमोर लाथा बुक्क्यांने, हाताने मारहाण करून ब्लेडच्या पानाने हातावर, तोंडावर वार करून जखमी करून फिर्यादीचा मोबाईल फोडून अंगावर पेट्रोल टाकण्याचा करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी वेगवेगळ्या कलमान्वये वेळापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून आरोपी अरुणसिंह फत्तेसिंह जाधव (मळोली) यास अटक केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी दिली आहे. गुन्ह्याचा तपास प्रभारी अधिकारी सपोनि दीपक जाधव हे करत आहेत.

बुलडाण्यातही पोलिसाची हत्या

अवैध रेती वाहतूक करणार्‍या टिप्परचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसाला टिप्पर चालकाने धडक देऊन चिरडल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी टिप्पर चालकासह मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसंच पोलिसांनी टिप्पर जप्त केले आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First Published: Apr 29, 2020 01:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading