मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Alert: पूरग्रस्तांच्या नावे बोगस NGO मागतायत मदत, पैसे देण्यापूर्वी करा खातरजमा

Alert: पूरग्रस्तांच्या नावे बोगस NGO मागतायत मदत, पैसे देण्यापूर्वी करा खातरजमा

फोनमध्ये TeamViewer QuickSupport, Microsoft Remote desktop, AnyDesk Remote Control, AirDroid: Remote access and File, AirMirror: Remote support and Remote control devices, Chrome Remote Desktop, Splashtop Personal- Remote Desktop हे app कधीही डाउनलोड करू नका.

फोनमध्ये TeamViewer QuickSupport, Microsoft Remote desktop, AnyDesk Remote Control, AirDroid: Remote access and File, AirMirror: Remote support and Remote control devices, Chrome Remote Desktop, Splashtop Personal- Remote Desktop हे app कधीही डाउनलोड करू नका.

सध्या पूरग्रस्तांच्या नावाखाली मदत मागून पैसे हडप (Money fraud) करणाऱ्या बोगस कंपन्यांचा (Bogus companies) सुळसुळाट वाढला असून त्यांच्यापासून सावध राहण्याचा इशारा पोलिसांनी (police) दिला आहे.

  • Published by:  desk news

Alert: पूरग्रस्तांच्या नावे बोगस NGO मागतायत मदत, पैसे देण्यापूर्वी करा खातरजमामुंबई, 30 जुलै : महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधील नागरिक सध्या पुरातून (Flood) सावरत असून त्यांच्या पुनर्वसनाचं काम सुरू आहे. त्यांच्या मदतीसाठी अनेकजण उत्सुक असून आपापल्या परीनं जमेल तेवढी मदत करत आहेत. मात्र सध्या पूरग्रस्तांच्या नावाखाली मदत मागून पैसे हडप (Money fraud) करणाऱ्या बोगस कंपन्यांचा (Bogus companies) सुळसुळाट वाढला असून त्यांच्यापासून सावध राहण्याचा इशारा पोलिसांनी (police) दिला आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या नावे मदत

कोकणातील रायगड जिल्ह्याला पावसाने सर्वाधिक झोडपून काढले. तर कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यालाही पुराचा फटका बसला. या नगारिकांच्या मदतीसाठी सध्या अनेकजण आवाहन करत असून त्यातील अनेक एनजीओ या बोगस असल्याचं पोलिसांना दिसून आलं आहे. या कंपन्यांमधील लोक फोनवरून आणि समाजमाध्यमांतून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पैशांची मागणी करतात. त्यासाठी ते एखादा बँक खाते क्रमांकही देतात. नागरिक ती पोस्ट वाचून काही पैसे खात्यांत जमा करतात. मात्र ही मदत प्रत्यक्ष पूरग्रस्तांपर्यंत पोहोचत नाही.

खबरदारी बाळगण्याचं आवाहन

यातून सायबर फसवणुकीचे प्रकारदेखील घडण्याची शक्यता पोलीस व्यक्त करत असून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पूरग्रस्तांच्या नावे हे सायबर चोर तुटपुंज्या रकमेची मागणी करतात. त्यासाठी बँक खात्याचे तपशील मागतात. पूरग्रस्तांसाठी भावूक होत अनेकदा नागरिक त्यांना तपशील देऊन टाकतात. मात्र या तपशीलांचा वापर करून नागरिकांच्या खात्यातून अव्वाच्या सव्वा रक्कम गायब होते. असे प्रकार टाळण्यासाठी सायबर गुन्हेगारांपासून सावध राहणे आणि कुणालाही आपल्या बँक खात्याचा पासवर्ड, ओटीपी किंवा इतर तपशील न देणे याची खबरदारी घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

हे वाचा - बळीराजा संतापला, BJP नेत्यावर हल्ला; कपडेही फाडले, एकाच आठवड्यातील दुसरी घटना

वैयक्तिक खाती

संस्थेच्या नावानं मदत मागणारी अनेक खाती ही वैयक्तिक नावाने असतात. अशा खात्यांमध्ये जमा झालेली रक्कम त्या व्यक्तीच्या नावे जमा होत असते. प्रत्यक्षात ही मदत गरजूंपर्यंत पोहोचत नाही. याचा अर्थ नागरिकांनी मदतच करू नये, असा होत नसून आपली फसवणूक होणार नाही, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलिसांनी मदत करण्यापूर्वी खातरजमा करण्याचा सल्ला दिला आहे.

First published:

Tags: Cyber crime, Rain flood