Home /News /maharashtra /

कायद्याचे रक्षकच बनले भक्षक; पोलीस कोठडीत सराफा व्यापाऱ्यावर केला अनैसर्गिक अत्याचार, गंभीर आरोप

कायद्याचे रक्षकच बनले भक्षक; पोलीस कोठडीत सराफा व्यापाऱ्यावर केला अनैसर्गिक अत्याचार, गंभीर आरोप

Crime in Akola: अकोला जिल्ह्यात एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. चोरीचं सोनं विकत घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सराफा व्यावसायिकावर काही पोलिसांनीच अनैसर्गिक अत्याचार (police unnatural sex with accused) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पुढे वाचा ...
    अकोला, 22 जानेवारी: अकोला (Akola) जिल्ह्यात एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. चोरीचं सोनं विकत घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सराफा व्यावसायिकावर काही पोलिसांनीच अनैसर्गिक अत्याचार (unnatural sex with gold trader) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे गंभीर आरोप संबंधित सराफा व्यावसायिकानेच लावले आहेत. या प्रकरणी पीडित व्यावसियाकानं अकोला पोलीस अधिक्षक आणि सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पण पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल करून घेतला नाही. शहर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याकडे या प्रकरणाची चौकशी सोपवण्यात आली आहे. नेमकं प्रकरण काय आहे? 9 जानेवारी रोजी अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण आणि शिपाई शक्ती कांबळे यांनी चोरीचं सोनं खरेदी केल्याप्रकरणी शेगावमधील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकला अटक केली होती. आरोपी पोलिसांनी रात्री 3 वाजता सराफा व्यावसायिकाला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर शेगाववरून अकोला याठिकाणी येत असताना, पोलिसांनी संबंधित सराफाला गाडीतच प्रचंड मारहाण केली होती. त्यानंतर रविवारी न्यायालयाने संबंधित सराफाला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. हेही वाचा-मित्र बायकोवर करत होता बलात्कार अन् पती देत राहिला पहारा, हिंगोलीतील घटना या दोन दिवसांच्या कालावधीत पोलीस निरीक्षक चव्हाण आणि पोलीस शिपाई कांबळे यानं बेदम मारहाण केली. हे प्रकरण केवळ एवढ्यावरच थांबलं नाही, तर त्यांनी संबंधित सराफा व्यापाऱ्यावर अनैसर्गिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी सराफाला जामीन मिळाल्यानंतर त्यानं घडलेला सर्व प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला आहे. त्यानंतर पीडित व्यावसियाकानं अकोला पोलीस अधिक्षक आणि सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. हेही वाचा-पुणे: TVचा आवाज वाढवून अल्पवयीन मुलीला बनवलं वासनेचा शिकार, 31वर्षीय नराधम गजाआड फिर्याद दाखल केल्यानंतर देखील पोलिसांकडून कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही. अद्याप आरोपी पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. पण शहर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याकडे या प्रकरणाची चौकशी सोपावण्यात आली आहे. पोलीस कोठडीत बंद असलेल्या आरोपीवर पोलिसांनीचं अशा प्रकारे अनैसर्गिक अत्याचार केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Akola, Crime news, Rape

    पुढील बातम्या