मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सांगलीतील भाजप नगरसेवक हत्या प्रकरणी नवी अपडेट, त्या नेत्याबद्दल पोलिसांची कारवाई

सांगलीतील भाजप नगरसेवक हत्या प्रकरणी नवी अपडेट, त्या नेत्याबद्दल पोलिसांची कारवाई

माजी नगरसेवक उमेश सावंत (डावीकडे)

माजी नगरसेवक उमेश सावंत (डावीकडे)

सांगलीतील भाजप नगरसेवक हत्या प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Sangli, India

असिफ मुरसल, प्रतिनिधी

सांगली, 1 एप्रिल : मागच्या महिन्यात जतमधील भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांची हत्या करण्यात आली. ताड यांच्या हत्या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी आता 5 जणांची नावे समोर आली. यात भाजपच्या माजी नगरसेवकाचा समावेश आहे. हत्या प्रकरणी माजी नगरसेवक उमेश सावंत हे मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले होते. त्यामुळे आता भाजप माजी नगरसेवक विजय ताड हत्या प्रकरणी माजी नगरसेवक उमेश सावंत फरारी घोषित करण्यात आले आहे.

गुन्ह्यात वापरलेले तीन पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त -

सांगलीच्या जत येथील भाजप नगरसेवक हत्या प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक उमेश सावंत याला पोलिसांनी फरारी घोषित करण्यात आले आहे. तसेच सावंत याची माहिती देणाऱ्यास 25 हजार रुपयांचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर मृत विजय ताड यांच्या खुनासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. यामध्ये 3 पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे, दोन मॅगझीन जप्त करण्यात आले आहे.

भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांची भरदिवसा गोळ्या झाडून आणि डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. 17 मार्च रोजी जत शहरातल्या सांगोला रोडवरील अल्फोंसो स्कूल जवळ ही घटना घडली होती. या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार हा भाजपचा माजी नगरसेवक उमेश सावंत असल्याचा समोर आले होते. याप्रकरणी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने, चौघा जणांना अटक केली होती. तर मुख्य सूत्रधार उमेश सावंत हा फरार झाला. सांगली पोलिसांनी सावंत याला आता फरारी घोषित केले आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Local18, Sangli