बीडमध्ये 'लाल चिखल', राजकीय कार्यक्रमांत नियमांचा फज्जा, पण शेतकऱ्यांवर पोलिसांची हिटलरशाही
बीडमध्ये 'लाल चिखल', राजकीय कार्यक्रमांत नियमांचा फज्जा, पण शेतकऱ्यांवर पोलिसांची हिटलरशाही
बीडमध्ये राजकीय मेळावे, वाढदिवस, सभा-संमेलन कोरोनाचे नियम पायदळी तुडवून मोठ्या थाटामाटात साजरे होत आहेत. दुसरीकडे मात्र बीडच्या माजलगावमध्ये आठवडी बाजारात भाजीपाला विकणाऱ्या सामान्य शेतकऱ्याचा भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्यात आला.
बीड, 29 जानेवारी : ज्येष्ठ लेखक भास्कर चंदनशिव यांची 'लाल चिखल' ही कथा प्रचंड प्रसिद्ध आहे. शेतीमालाला बाजारात भाव मिळत नाही म्हणून एक शेतकरी आपल्या शेताचा माल उद्विग्नतेतून रस्त्यावर फेकून देतो. कथेतील शेतकरी त्याच्या शेतात उगवलेले सर्व टोमॅटो जमिनीवर फेकतो. त्याच्यावर चालतो. यावेळी त्याच्या मनाची झालेली अनावस्था कथेत अत्यंत मार्मिकपणे जाणवते. याच टोमॅटोंचा लाख चिखल बाजारातील रस्त्यावर निर्माण होतो. ही कथा सांगण्यामागचं कारण म्हणजे बीडमध्ये आठवडी बाजारात शेतीचा माल विकणाऱ्या शेतकऱ्यांचा भाजीपाला पोलिसांकडून रस्त्यावर फेकला जातोय. त्यामुळे हा 'लाल चिखल' शेतकऱ्यांकडून नसला तरी पोलिसांकडून आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. विशेष म्हणजे बीडमध्ये मोठमोठे राजकीय कार्यक्रमं होत आहेत. तिथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतोय. पण पोलीस तिकडे कारवाई करत नाही, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
संबंधित घटनेमुळे कोरोनाचे नियम फक्त सामन्य नागरिकांनाच आहेत का? असा सवाल बीडमधील नागरीक करत आहेत. एकीकडे राजकीय मेळावे, वाढदिवस, सभा-संमेलन कोरोनाचे नियम पायदळी तुडवून मोठ्या थाटामाटात साजरे होत आहेत. दुसरीकडे मात्र बीडच्या माजलगावमध्ये आठवडी बाजारात भाजीपाला विकणाऱ्या सामान्य शेतकऱ्याचा भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्यात आला. या दोन घटनांमुळे फक्त नियम सर्वसामान्यांसाठी आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. बीड जिल्हात दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा नवा उच्चांक गाठत असताना, राजकीय नेतेमंडळी मात्र नियम पाळत नसल्याचे दिसून आले.
(सीताराम कुटेंचा ईडीसमोर गौप्यस्फोट, अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार?)
दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा म्हणून बीडमध्ये वरद ग्रुपच्यावतीने लोकनेते गोपीनाथराव मुंडे नगर उभे करण्यात आले आहे. याचा लोकार्पण सोहळा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी उद्घाटनाच्या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे या दोघींच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मात्र कोरोना नियमांचा अक्षरशः फज्जा उडाला होता. या वेळी गर्दीमध्ये नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर देखील मास्क नव्हता.
बीडमधअये एकीकडे राजकीय मेळाव्यांमध्ये कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. दुसरीकडे बीडच्या माजलगावमध्ये आठवडी बाजारात भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांचा भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्यात आला. या दोन घटनांमुळे फक्त नियम सर्वसामान्यांसाठी आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. pic.twitter.com/VEurK7NTnC
दुरीकडे माजलगावमध्ये शेतकऱ्यांचा भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्यात आला. पण राजकीय कार्यक्रमांच्यावेळी पोलीस प्रशासन असतानाही कोरोना नियमांचं उल्लंघन होतं. तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मग फक्त आठवडी बाजारातील शेतकऱ्यांविरोधातच प्रशासनाची हिटलरशाही का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तसेच कायदा फक्त सामान्य नागरिकांसाठी आहे का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.