मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धनंजय मुंडेंची दुसरी पत्नी असण्याचा दावा करणारी महिला अडचणीत, पोलिसांनी घेतली घराची झडती

धनंजय मुंडेंची दुसरी पत्नी असण्याचा दावा करणारी महिला अडचणीत, पोलिसांनी घेतली घराची झडती

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP Leader) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची दुसरी पत्नी (Second Wife) असण्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्माच्या (Karuna Sharma) घराची पोलिसांनी झडती (Search at home) घेतली आहे.

  • Published by:  desk news

मुंबई, 8 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP Leader) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची दुसरी पत्नी (Second Wife) असण्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्माच्या (Karuna Sharma) घराची पोलिसांनी झडती (Search at home) घेतली आहे. तिच्या गाडीतून एक रिव्हॉल्व्हर सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली असून करुणाच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत.

काय आहे प्रकरण?

आपण धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी आहोत, असा दावा करणाऱ्या करुणा शर्माने नुकतीच एका पत्रकार परिषदेची घोषणा केली होती. आपल्याला काही धक्कादायक गोष्टी माध्यमांसमोर मांडायच्या असल्यामुळे आपण पत्रकारांना पाचारण करत असून सर्वांसमोर काही गोष्टी जाहीरपणे मांडणार असल्याचं करुणा शर्माने जाहीर केलं होतं. मात्र ही पत्रकार परिषद होण्यापूर्वी जातीवाचक शिविगाळ आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली परळी पोलिसांनी करुणा शर्माला अटक केली होती.

करुणा शर्माने एक व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला जातीवाचक शिविगाळ केल्याचा  आरोप ठेवण्यात आला आहे. करुणाला शर्माला अटक केल्यानंतर तिच्या कारमधून एक रिव्हॉल्व्हर सापडल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी शर्माच्या सांताक्रूझमधल्या निवासस्थानी धाड टाकून घराची झडती घेतली. बुधवारी सकाळच्या सुमाराला पोलिसांनी धाड टाकून झडती घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. याबाबत कुठलेही अधिक तपशील द्यायला पोलिसांनी नकार दिला आहे.

हे वाचा - अफगाणिस्तानच्या गृहमंत्र्याची माहिती द्या आणि कमवा 50 लाख डॉलर: अमेरिका

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी असल्याचा दावा करुणा शर्माने केला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. प्रकरण धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यापर्यंत पोहोचले होते. हा राजकीय कटाचा भाग असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण शांत झाले होते. मात्र आता पुन्हा पत्रकार परिषद घेण्याच्या निमित्ताने करुणा शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आहे. या अटकेमागे पत्रकार परिषदेचा काही संचाबंध आहे का, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. या पत्रकार परिषदेत करुणा शर्मा नेमकं काय सांगणार, याबाबतची उत्सुकतादेखील वाढली आहे.

First published: