रवी शिंदे, भिवंडी, 26 जानेवारी : भिवंडी शहरातील कामतघर रोडवरील असलेल्या वऱ्हाळा देवी तलावात एक महिला पाय घसरून पडली. ही माहिती स्थानिक नागरिकांनी गस्तीवरील पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन महिलेला बाहेर काढून तिचे प्राण वाचवले आहे. ललिता अनिल धोत्रे ( 54)असे प्राण वाचवलेल्या महिलेचे नाव आहे.
भिवंडीतील वऱ्हाळा देवी तलावात ललिता अनिल धोत्रे ही महिला पाय घसरून पडली. त्यावेळी नागरिकांनी तेथून जाणारे पोलीस शिपाई काळे,पोलिस शिपाई मेहर यांना सांगताच त्यांनी तात्काळ तलावाकडे धाव घेतली. तलावामधून त्या महिलेला बाहेर काढून तीला तिचे नातेवाईक अजय धोत्रे यांच्या ताब्यात दिले आहे.
नागरिकांनो सजग रहा, प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याला अतिदक्षतेचा इशारा
महत्वाची बाब म्हणजे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी शहरात नागरिक जागृत होण्यासाठी विशेष मोहीम राबवत आहेत. त्यामुळे आज नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण होत असल्याने एका महिलेचा प्राण वाचल्याने पोलिसांच्या या चांगल्या कामाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhiwandi