धाडसाला सलाम ! वाशी खाडीत उडी घेऊन पोलिसांनी वाचवला तरुणीचा जीव

धाडसाला सलाम ! वाशी खाडीत उडी घेऊन पोलिसांनी वाचवला तरुणीचा जीव

नवी मुंबईतील वाशी खाडीपुलावरून खाडीत उडी मारून आत्महत्या करणाऱ्या तरुणीचा जीव वाहतूक पोलिसांनी वाचवला आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 24 जुलै : नवी मुंबईतील वाशी खाडीपुलावरून खाडीत उडी मारून आत्महत्या करणाऱ्या तरुणीचा जीव वाहतूक पोलिसांनी वाचवला आहे. यासाठी पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. मंगळवारी (23 जुलै) संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कुसलूम खान ही 21 वर्षीय तरुणी वाशी खाडी पुलावरून आपल्या नवऱ्याशी व्हिडीओ कॉलवर बोलत होती. त्यांच्यात वाद सुरू होते. यादरम्यान, ती आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असल्याची बाब वाहतूक पोलिसांचा मदतनीस सचिन पवार यांच्या लक्षात आलं. त्यांनी तातडीनं याची माहिती सहकाऱ्यांना दिली.

(पाहा :SPECIAL REPORT: OLX वरून खरेदी करताय? सावधान! अशी होऊ शकते तुमची फसवणूक)

यानंतर कुसलूमला वाचवण्यासाठी पोलीस हवालदार सूर्यकांत बारस्कर, शिवाजी बसरे आणि दर्शन म्हात्रे यांनी खाडीत उडी मारली आणि तिला जीवदान दिलं. कुसलूम ही चेंबूरमधील विष्णुनगर येथील रहिवासी आहे.शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी तिला नातेवाईकांच्या स्वाधीन केलं. दरम्यान, कुसलूमला जीवदान देणाऱ्या पोलीस हवालदार सूर्यकांत बारस्कर आणि त्याच्या टीमच्या कामगिरीचं कौतुक करत सर्वांनीच त्यांचं अभिनंदन केलं.

(पाहा :भाज्यांचे दर गगनाला; काय आहेत भाज्यांचे दर? पाहा VIDEO)

VIDEO: आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस बरसला, सखल भागांत साचलं पाणी

First published: July 24, 2019, 9:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading