मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

तो नदीत बुडत होता अन् कुणाला दिसलाच नाही, अखेर वर्दीतला माणूस देवासारखा धावला, थरारक VIDEO

तो नदीत बुडत होता अन् कुणाला दिसलाच नाही, अखेर वर्दीतला माणूस देवासारखा धावला, थरारक VIDEO

बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक शिवराज लोखंडे आणि शिपाही प्रवीण रामटेके यांना हा मुलगा बुडताना दिसला.

बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक शिवराज लोखंडे आणि शिपाही प्रवीण रामटेके यांना हा मुलगा बुडताना दिसला.

बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक शिवराज लोखंडे आणि शिपाही प्रवीण रामटेके यांना हा मुलगा बुडताना दिसला.

गडचिरोली, 16 एप्रिल : 'देव तारी त्याला कोण मारी' असं उगाच आपल्याकडे म्हटलं जात नाही. प्राणहीता नदीवर ( Pranhita river) पुष्कर सिंहस्थ कुंभमेळा सुरू आहे. अंघोळ करत असताना एक 7 वर्षांचा मुलगा नदीत बुडत होता. पण, वेळीस एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याला पाहिले आणि वाचवले. हा संपूर्ण थरारक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

गडचिरोलीमध्ये प्राणहीता नदीवर पुष्कर सिंहस्थ कुंभ मेळा सुरू असून हजारो भाविक नदीत आंघोळ करीत आहेत. आंध्रप्रदेश श्रीकाकुलम येथून अनेक भाविक इथं आले होते. यावेळी भाविकांचा मुलगा गुडला अरुण हा पाण्यात अंघोळ करण्यासाठी उतरला. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो बुडू लागला होता. त्याच्या शेजारी बरीच लोक अंघोळ करत होती, पण कुणालाच तो दिसला नाही.

यावेळी किनाऱ्यावर  बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक शिवराज लोखंडे आणि शिपाही प्रवीण रामटेके यांना हा मुलगा बुडताना दिसला. त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता त्यांनी पाण्यात उडी घेतली आणि मुलाला बाहेर काढले.

(कपड्यांशी आपलं नातं आहे 35 हजार वर्षं जुनं, जाणून घ्या कसे बनतात कपडे)

तात्काळ नदीत धाव घेऊन मुलाला पाण्यातून वर खेचून किनाऱ्यावर आणले. त्यानंतर त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोटात पाणी गेलेल्या मुलावर उपचार करण्यात आले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेमुळे मुलाचा जीव वाचला असून सर्वच स्तरातून पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.

नदीपात्रात बुडून तरुण मामा-भाच्याचा मृत्यू

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये तरुण मामा आणि भाच्याचा मृत्यू झाल आहे. अंघोळीसाठी गेलेल्या मामा-भाच्याचा नदीच्या डोहात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सटाणा तालुक्यातील दहिन्दुले येथे घडली आहे. रोशन बागुल आणि गणेश जगताप अशी या दोघांची नावे आहेत. नदीच्या डोहात उतरल्यानंतर गणेशला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो बुडू लागल्याचे पाहून त्याला वाचवण्यासाठी मामा रोशनने पाण्यात उडी मारली. मात्र दोघांना पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे सटाणा तालुक्यात शोककळा पसरली आहे.

First published: