यवतमध्ये १ कोटीचा गुटखा जप्त

यवतमध्ये १ कोटीचा गुटखा जप्त

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरुन पुण्याकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोमध्ये ४९ गोण्यांमध्ये हा गुटखा आढळून आलाय.

  • Share this:

30 जुलै : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात यवत पोलिसांनी १ कोटी ५ लाखांचा गुटखा पकडलाय. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरुन पुण्याकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोमध्ये ४९ गोण्यांमध्ये हा गुटखा आढळून आलाय. याची किंमत सुमारे १ कोटी ५ लाख रुपये असून पोलिसांनी गुटख्यासह आयशर टेम्पोही जप्त केलाय. यवत पोलिसांनी कासुर्डी टोलनाका इथं ही कारवाई केलीय.

यवत पोलिसांना MH 43 Y 5251 या वाहनातून गुटखा नेला जात असल्याची माहिती मिळाली होती. टेम्पो पकडण्यासाठी सापळा लावला होता, परंतु हा टेम्पो त्यांना हुलकावणी देऊन सुसाट वेगात पुण्याच्या दिशेने गेला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करत टेम्पो कासुर्डी टोलनाका येथे पकडला.

पोलिसांनी 42 वर्षांचा टेम्पो चालक सत्यपाल गोकुळराव सिंह आणि त्याचा साथीदार बिरबल गोपीराम मिना यांना ताब्यात घेतलं असून सगळा मुद्देमालही जप्त केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2017 06:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading