महाराष्ट्रात लवकरच 8 हजार नोकऱ्यांची संधी, पोलिसात मेगा भरतीचे गृहमंत्र्यांनी दिले संकेत

महाराष्ट्रात लवकरच 8 हजार नोकऱ्यांची संधी, पोलिसात मेगा भरतीचे गृहमंत्र्यांनी दिले संकेत

पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यात येणार असून लवकरच 7 ते 8 हजार पोलिसांची भरती होईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

  • Share this:

अमरावती, 14 जानेवारी : देशात शेतकरी आत्महत्येपेक्षा बेरोजगारांनी जास्त आत्महत्या केल्याचा रिपोर्ट आल्यानंतर आता राज्य सरकारने तरुणांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आता गृह खात्याने लवकरच मेगा भरती करण्यात येणार असल्याचे सांगितलं आहे. पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यात येणार असून लवकरच 7 ते 8 हजार पोलिसांची भरती होईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अनिल देशमुख  बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्यात मेगा भरती होईल असं सांगितलं. रिक्त जागांवर भरती झाल्यास राज्यातील पोलीसांवरील ताण कमी होईल असं म्हटलं जात आहे.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार पावले उचलणार आहे. अवैध सावकारी, नक्षलवादाला आळा घालण्यासाठी उपाययोजना आखण्यात येणार आहेत असं अनिल देशमुख यांनी सांगितलं. तरुणांनी अभ्यासात सातत्य ठेवायला हवं. पोलीस भरतीसह स्पर्धा परीक्षेत ग्रामीण भागातील तरुणांनीही उतरावं असंही अनिल देशमुख म्हणाले.

Government Job : RBI मध्ये नोकरीच्या संधी, या तारखेआधी करा अर्ज

विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढलं आहे. त्याबद्दल काळजी व्यक्त करताना देशमुख म्हणाले की, पालकांनी मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नये. अभ्यास करताना पाठांतर, घोकंपट्टीवर जोर देऊ नका. याऐवजी बौद्धीक वाढ होते की नाही याकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे असंही देशमुख म्हणाले.

वाचा : परीक्षा न देताच होणार निवड, 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: police
First Published: Jan 14, 2020 01:31 PM IST

ताज्या बातम्या