सांगली, 20 जानेवारी : बनावट नोटाप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी सांगलीमध्ये छापा टाकला आहे. शहरातील एका बंगल्यावर छापा टाकून तपासणी करण्यात आली. या छाप्यात बनवाट नोटा छापण्याचे काही साहित्य सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांच्या छाप्याची माहिती मिळताच आरोपी विश्वनाथ जोशी फरार झाला असल्याची माहिती आहे.
सांगलीतील शामरावनगर भागातील अरिहंत कॉलनी मधील एका आलिशान बंगल्यावर कोल्हापूरच्या गांधीनगर पोलीसांनी बनवाट नोटाप्रकरणी छापा टाकला. सुमारे 12 जणांच्या पोलीस पथकाने ही थेट कारवाई केली आहे. याची सांगली पोलिसांनीही उशीरापर्यंत कल्पना नव्हती.
या छाप्याचा सुगावा लागताच विश्वनाथ जोशी हा फरारी झाला आहे. तर त्याचा आणखी एक साथीदार या बनावट नोटाप्रकरणात सामील असल्याची माहिती समोर आली आहे. पाचशे आणि दोन हजारांच्या नोटा छापून त्या एजंट मार्फत खपवण्यात येत असल्याची माहिती आहे.
VIDEO : मासे पकडण्यासाठी टाकला गळ, हाती लागला 'खजाना'