बारामतीत लॉजवर छापा.. वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या दोन महिलांची सुटका

बारामतीत लॉजवर छापा.. वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या दोन महिलांची सुटका

पोलिसांनी एमआयडीसीतील एका लॉजवर छापा टाकून वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या दोन महिलांची सुटका केली आहे. लॉजिंग व्यवस्थापकासह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

  • Share this:

जितेंद्र जाधव, (प्रतिनिधी)

बारामती, 3 ऑगस्ट- शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील जी. एस हॉटेल अँड लॉजिंगमध्ये बेकायदा वेश्‍या व्यवसायप्रकरणी बारामतीच्या गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी (दि. 2) रात्री पावणेदहाच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात लॉज व्यवस्थापकासह दोघांना अटक केली. पोलिसांनी वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या दोन महिलांची सुटका केली आहे. लॉजिंग व्यवस्थापकासह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. व्यवस्थापक निखिल ज्ञानदेव कनिचे (रा. सूर्यनगरी, बारामती, मूळ रा. तक्रारवाडी, ता. इंदापूर) व केतन विलास मोरे (रा. शेळगाव, ता. इंदापूर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती एमआयडीसीमध्ये महाराष्ट्र बॅंकेशेजारीस एका लॉजिंगवर पोलिसांनी छापा टाकला. लॉजिंगवर वेश्या व्यवसायासाठी दोन महिलांना आणल्याचे आढळून आले. पोलिसांनी महिलांची सुटका केली. यातील एक महिला शेळगाव येथील तर दुसरी ठाणे जिल्ह्यातील आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी दोन हजाराची रक्कम, एक मोबाइल व अन्य साहित्य असा 11 हजारांचा मुद्देमाल जप्त केलाआहे. दोन्ही आरोपींविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सतत रडते म्हणून दारुड्या बापानेच आवळला एक वर्षाच्या चिमुरडीचा गळा

लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील संतापजनक घटना घडली आहे. मुलगी सतत रडते म्हणून दारुड्या बापानेच गळा आवळून तिचा खून केल्याची घटना निटूर या गावात घडली आहे. शिवाजी लाळे असे निर्दयी बापाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेली माहिती अशी की, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील निटूर गावातील रहिवाशी असलेला शिवाजी लाळे याने आपल्या एक वर्षीय श्रावणी नावाच्या मुलीला गळा आवळून खून केला आहे. श्रावणी खूप रडते म्हणून निर्दयी बापाने हे कृत्य केले आहे. शिवाजी लाळे हा गुरुवारी (1 ऑगस्ट) सायंकाळी दारूच्या नशेत घरी आला. श्रावणी तिच्या आईजवळ (मुक्ता) होती. ती सारखी रडत होती. श्रावणीला झोपवतो असे सांगून शिवाजीने तिला घेतले आणि तिचा गळा आवळून तिला ठार मारले. श्रावणीचा आवाज कसा येत नाही, हे पाहण्यासाठी मुक्ता तिच्याजवळ गेली. मात्र, तिची काहीच हालचाल होत नसल्याने ती घाबरली. तिने तातडीने रुग्णालय गाठले. मात्र, डॉक्टरांनी चिमुकल्या श्रावणीला मृत घोषित केले. मृत श्रावणीला घेऊन मुक्ताने पोलीस स्टेशन गाठून घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपी शिवाजी लाळे या निर्दयी बापाला अटक केली.

आरोपी शिवाजी लाळे हा आधीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. शिवाजीच्या पहिल्या पत्नीने त्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्याला तुरुंगवासही झाला होता. नंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. मुक्ता यांच्याशी त्याचे दुसरे लग्न झाले. हॉटेलच्या व्यवसायातून नफा मिळत नसल्याने दारूच्या आहारी गेलेल्या शिवाजीने हे क्रूर कृत्य केले.

VIDEO : ... आणि धुवांधार पावसात जीव धोक्यात घालून प्रवासी ट्रॅकवरून धावले

First published: August 3, 2019, 11:13 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading