खळबळजनक! सुसाईड नोट WhatsApp करुन पोलीस कर्मचारी बेपत्ता; मोबाइल सुद्धा बंद

Policeman missing by posting suicide note on WhatsApp: पोलीस कर्मचाऱ्याने सुसाइट नोट व्हॉट्सअ‍ॅपवर पोस्ट करुन बेपत्ता झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Policeman missing by posting suicide note on WhatsApp: पोलीस कर्मचाऱ्याने सुसाइट नोट व्हॉट्सअ‍ॅपवर पोस्ट करुन बेपत्ता झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

  • Share this:
जालना, 11 जुलै : जिल्ह्यातील एक पोलीस कर्मचारी अचानक बेपत्ता (Police personnel missing) झाला आहे. बेपत्ता होण्यापूर्वी या पोलीस कर्मचाऱ्याने सुसाईड नोट (Suicide note) लिहिली असून ती व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp)वर पोस्ट केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर सुसाईड नोट पोस्ट केल्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्याने आपला फोन बंद (Mobile phone switch off) केला आणि तेव्हापासून तो बेपत्ता झाला आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. या संपूर्ण घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील (Jalna District) सेवली पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या उखळी गावात गावठी दारूच्या अड्ड्यावर कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई एका पोलीस कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरून करण्यात आल्याची माहिती कोणी तरी दिली होती. त्यामुळे आरोपी आणि त्याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात जाऊन या पोलीस कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घालून शिवीगाळ केली. इतकेच नाही तर त्याला धमकी सुद्धा दिली होती. भंडारदरा परिसरात मद्यधुंद पर्यटकांचा पोलिसांवर हल्ला; मग पोलिसांनीच उतरवली तळीरामांची झिंग यानंतर सदर पोलीस कर्मचारी याने हे पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. आपण प्रभारी अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहोत, अशी चिठ्ठी लिहून त्याने पोलीस ठाण्याच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर पोस्ट केली. सुसाईड नोट व्हॉट्सअ‍ॅपवर पोस्ट केली आणि त्यानंतर दुपारपासून मोबाइल बंद करून हा पोलीस कर्मचारी बेपत्ता झाला आहे. आपल्या मरणास संबंधित प्रभारी अधिकारी, आरोपी पती-पत्नी जबादार राहणार असून, त्याची सर्व माहिती माझ्या पत्नीस द्यावी असे चिट्ठीत नमूद केले आहे.
Published by:Sunil Desale
First published: