बीड, 19 जानेवारी : बीड (beed) जिल्ह्यातील परळी (Parali) इथं रेल्वे उड्डाणपुलावरून उडी मारुन एका पोलीस कर्मचाऱ्याने (Police constable) आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सुनील घोळवे असं या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परळीत एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी येथील संभाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुनील सुंदरराव घोळवे बक्कल क्रमांक 755 यांनी सोमवारी संध्याकाळी 8.15 वाजेच्या सुमारास रेल्वे उड्डाणपुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.
'Wonder Kid of India' एथलिट पूजा विश्रोई; लहान वयात मोठी कामगिरी
सदरची घटना समजताच संभाजीनगर पोलीस ठाणे आणि शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि नागरिक घटनास्थळी धावून आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.
पोस्टाच्या या योजनेत सुरक्षित गुंतवणूक, पैसे होतील दामदुप्पट
सुनील घोळवे यांनी रेल्वे उड्डाणपुलावर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न का केला याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस कर्मचारी सुनील घोळवे गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना परळीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.