जळगाव, 3 मार्च : जळगावातील एका पोलीस निरीक्षकाविरुद्ध तिच्याच पत्नीने गुन्हा दाखल केला आहे. चांगल्या पोलीस ठाण्यात बदली करुन घेण्यासाठी या पोलीस निरीक्षकाला 15 लाखांची गरज होती. बदलीसाठी लागणारे पैसे पोलीस निरीक्षक पत्नीला तिच्या माहेराहून आणण्यासाठी जबरदस्ती करीत होता. यासाठी आरोपी पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करीत होता. याशिवाय आरोपी पत्नीला जीवे मारण्याची धमकी देत होता. या कारणाने आरोपीच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
अकोला येथील डाबकी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक किशोर वानखडे असं या आरोपीचं नाव आहे. या आरोपीविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगिता असं आरोपीच्या पत्नीचे नाव आहे. त्या नाशिक येथील सिडको चाणक्यनगरीत राहत होत्या. 2011 मध्य़े त्यांचा अमळनेर येथील किशोर वानखेडे यांच्यासोबत विवाह झाला.
विवाहाच्यावेळीदेखील कुटुंबीयांनी 8 लाख 25 हजार रुपयांचा हुंडा आणि लग्न असा एकून 15 लाखांचा खर्च केल्याचा दावा योगिता यांनी केला आहे. लग्नानंतर आरोपीची नेमणूक पुणे येथे झाली. त्यानंतर नाशिक, बुलढाणा येथेही आरोपी किशोर वानखडे यांची बदली झाली. त्यादरम्यान दोघांना एक मुलगी व मुलगा झाला. चांगल्या पोलीस ठाण्यात बदली मिळविण्यासाठी आरोपी पत्नीकडे 15 लाखांची मागणी करीत होता व याकारणाने माझा छळ करीत असल्याचा दावा योगिता यांनी केला आहे. याशिवाय पती किशोर हा सतत मारहाण व शिवीगाळ करीत असल्याचा आरोपही योगिता यांनी केला आहे.
हे वाचा - सूनेचा छळ केल्याप्रकरणी NCPच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.