मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पोटावरून गेलं ट्रेलरचं चाक, पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यूने सगळेच हळहळले

पोटावरून गेलं ट्रेलरचं चाक, पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यूने सगळेच हळहळले

police

police

ट्रेलरची धडक बसल्यानंतर पोलिस कर्मचारी चाकाखाली सापडला. यात पोलिसाचा जागीच मृत्यू झाला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नेहाल भुरे, भंडारा, 26 मार्च : दुचाकीवरून घरी निघालेल्या पोलिस कर्मचाऱ्याला भरधाव ट्रेलरने चिरडल्यानं जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. भंडारा शहरातल्या त्रिमूर्ती चौकात ट्रेलरची धडक बसल्यानंतर पोलिस कर्मचारी चाकाखाली सापडला. यात पोलिसाचा जागीच मृत्यू झाला. भंडारा शहरात 24 तासात अपघाती मृत्युची दूसरी घटना घड़ल्यांने शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अपघातात राजपुत मते (वय 56 वर्ष) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. राजपूत मते हे पोलिस लाइन भंडारा येथे राहत होते. ते लाखनी पोलिस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक पदावर कार्यरत होते. मार्केटमधून भाजी घेऊन आपल्या पोलिस लाइन येथे घरी दुचाकीने जात असताना त्यांचा अपघात झाला.

ग्राहकाच्या त्रासाला कंटाळून दुकानदाराचं टोकाचं पाऊल, काय आहे प्रकरण? 

राजपूत मते यांना अचानक भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलर ट्रकने धड़क दिली. धड़क इतकी जबर होती की ते चाकाखाली सापडून जागीच गतप्राण झाले. त्यांच्या पोटावरून ट्रेलरचे चाक गेले. राजपूत मते यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी हळहळ व्यक्त केलीय. या घटनेनंतर चौकात असलेल्या वाहतूक पोलिसांनी ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृतक राजपूत मते याच्या मागे 2 मुले, 1 मुलगी, पत्नी, आई असा परिवार आहे.

First published:
top videos

    Tags: Crime