आपल्याच सहकाऱ्याचा मृतदेह पाठवा लागला शवविच्छेदनासाठी, अमरावती पोलीस दलातील दु:खद घटना

आपल्याच सहकाऱ्याचा मृतदेह पाठवा लागला शवविच्छेदनासाठी, अमरावती पोलीस दलातील दु:खद घटना

कोरोनाची लागण झाल्यामुळे राज्यात पोलिसांचा मृत्यू झाला आहे. पण, अशाही परिस्थितीत पोलीस आपलं कर्तृव्य बजावत आहे.

  • Share this:

अमरावती, 18 मे : महाराष्ट्रापुढे कोरोना व्हायरसचे मोठे संकट उभे ठाकले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस आपल्या जीवाची बाजी लावून कर्तृव्य बजावत आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे राज्यात पोलिसांचा मृत्यू झाला आहे. पण, अशाही परिस्थितीत पोलीस आपलं कर्तृव्य बजावत आहे. परंतु, अमरावतीमध्ये एका दुर्दैवी अपघातात पोलीस कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागला आहे.

अमरावती जिल्ह्यातील वरुड पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी राजेश वानखेडे यांचं अपघाती मृत्यू झाला आहे. 16 मे रोजी राजेश वानखेडे हे वरूडवरून अमरावती कार्यालयीन कामकाजासाठी  आपल्या दुचाकीने जात होते.

हेही वाचा -पिंपरी चिंचवडमध्ये कुख्यात गुंड महाकालीच्या भावाचा निर्घृण खून

राजेश वानखेडे हे दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास लेहगावजवळ पोहोचले असता अचानक  दुचाकीच्या समोरील चाकाचे टायर फुटल्याने अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, टायर फुटल्यामुळे वानखेडे यांचं दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि ते दूरपर्यंत फरफटत गेले. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

राजेश वानखेडे यांच्या अपघाताची माहिती मिळताच शिरखेड पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून वानखेडे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन  शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे.  या प्रकरणाचा अधिक तपास शिरखेड पोलीस करत आहेत.

हेही वाचा -आता रेड झोनमध्ये करता येणार ऑनलाईन शॉपिंग, होणार 'या' सामानाची डिलिव्हरी

राजेश वानखेडे यांच्या अपघाती निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तसंच अमरावती पोलीस दलातूनही दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 18, 2020, 11:37 AM IST
Tags:

ताज्या बातम्या