जॉइनिंगच्या दिवशी फायरिंग, स्वत: वर गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या

जॉइनिंगच्या दिवशी फायरिंग, स्वत: वर गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या

घडलेल्या या प्रकारमुळे पोलीस स्टेशनमध्ये एकच खळबळ उडाली. भूषण पवार हे अत्यंत मनमिळावून स्वभावाचे होते.

  • Share this:

नवी मुंबई, 14 फेब्रुवारी : नवी मुंबई (Navi Mumbai) येथील एमएमसी पोलीस स्टेशनमध्ये (APMC Police Station) मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. पहिल्या दिवशीच रूजू झालेल्या एका पोलीस निरीक्षकाने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये आज सकाळी ही घटना घडली. भूषण पवार असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. भूषण पवार हे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. मागील 2 महिन्यांपासून ते रजेवर होते. दोन महिन्यांची रजा संपवून ते आज ड्युटीवर हजर झाले होते. त्यानंतर चौकशी करणाऱ्या खोलीत जाऊन त्यांनी पिस्तुलीतून स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली.

याठिकाणाहून शिर्डी-शनि शिंगणापूरला जाणाऱ्यांसाठी खास ऑफर, स्वस्तात करा प्रवास

घडलेल्या या प्रकारमुळे पोलीस स्टेशनमध्ये एकच खळबळ उडाली. भूषण पवार हे अत्यंत मनमिळावून स्वभावाचे होते. आत्महत्येचं पाऊल उचलतील अशी कुणालाही शंका नव्हती. पण, आज पोलीस स्टेशनमध्ये रूजू झाल्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

पाकिस्तानी टीममध्ये पुन्हा वाद, सरफराजने हफीजला ट्विटरवरच सुनावलं

त्यांनी उचललेल्या या टोकाचा पाऊलामुळे त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. भूषण पवार यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही. एपीएमसी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.

Published by: sachin Salve
First published: February 14, 2021, 1:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या