हातावर पोटभरणाऱ्याने लावली पोह्याची गाडी, पोलिसांनी असं करायला नको होतं, पाहा हा VIDEO

हातावर पोटभरणाऱ्याने लावली पोह्याची गाडी, पोलिसांनी असं करायला नको होतं, पाहा हा VIDEO

अमरावती शहरातील राधानगर इथं एका तरुणाने शाही इंदुरी पोहा नाश्त्याची गाडी लावली होती.

  • Share this:

अमरावती, 23 मार्च : कोरोना  व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात कलम 144 अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.  असं असताना लोकं मात्र नाव ऐकायला तयार नाही. रस्त्यावर लोकं पाहायला मिळत आहे.

अमरावती शहरातील राधानगर इथं एका तरुणाने शाही इंदुरी पोहा नाश्त्याची गाडी लावली होती.  गाडी लावल्यामुळे लोकांचीही तिथं गर्दी जमली होती. अनेक लोकं नाश्ता करायला पोहोचलेही होते. त्याचवेळी पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि गाडीवाल्याला ताब्यात घेतलं. पण, त्यानंतर पोलिसांनी भर-रस्त्यावर या पोहेवाल्याला बेदम चोप दिला. कपडे फाटेपर्यंत त्याला मारहाण करण्यात आली. राज्यात अनेक ठिकाणी नागरिक जमावबंदी मोडत आहे. पण, काही ठिकाणी सौम्य स्वरूपात कारवाई करून समज दिला जात आहे. पण, अमरावती पोलिसांनी पोहेवाल्याला कपडे फाटेपर्यंत मारलं.

पोलिसांनी त्याला पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या या कारवाईचा आसपासचा आदेश झुगारून दुकाने सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांनी चांगलाच धसका घेतला आहे. सध्या हा व्हिडिओ जिल्ह्यात चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे आता सामान्य नागरिकांनी कारण नसताना बाहेर फिरू नये, या सरकारच्या आदेशाच पालन करावं, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

डोंबिवलीमध्ये टवाळखोरांना उठाबशाची शिक्षा

दरम्यान, सरकारने जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना जनसेवेसाठी रस्त्यावर उतरणं भाग आहे. परंतु, काही महाभाग गरज नसताना रस्त्यावर उतरुन प्रशासनावरील ताण वाढवत आहे. सरकारने अशा टवाळखोरांवर कारवाईचा इशारा दिला आहे. तुर्तास काही जणांना सौम्य शिक्षा देऊन पिटाळून लावण्यात येत आहे.

डोंबिवली पूर्वेतील रस्त्यावर फिरणाऱ्या तरुणांना पोलिसांनी उठाबशाची शिक्षा दिली. कारणाविना फिरणाऱ्या तरुणांना तूर्तास सौम्य शिक्षा दिली जात असली, तरी कारवाईचं स्वरुप लवकरच गंभीर केलं जाणार आहे. जनता कर्फ्यूवेळी क्रिकेट खेळणाऱ्या 17 जणांवर कल्याणमध्ये गुन्हाही दाखल झाला आहे.

First published: March 23, 2020, 5:43 PM IST
Tags:

ताज्या बातम्या