Home /News /maharashtra /

अनुप डांगेंचा आणखी एक लेटर बॉम्ब; पोलीस आयुक्तांना पत्र लिहून केला नवा आरोप

अनुप डांगेंचा आणखी एक लेटर बॉम्ब; पोलीस आयुक्तांना पत्र लिहून केला नवा आरोप

अनुप डांगे यांनी आणखी एक लेटर बॉम्ब (Letter Bomb) टाकला आहे. पोलीस आयुक्त संजय पांडे (Commissioner of Police Sanjay Pandey) यांना अनुप डांगे यांनी पत्र लिहिलं आहे.

मुंबई, 16 मे: पोलीस अधिकारी (Police officer) अनुप डांगे यांनी आणखी एक लेटर बॉम्ब (Letter Bomb) टाकला आहे. पोलीस आयुक्त संजय पांडे (Commissioner of Police Sanjay Pandey) यांना अनुप डांगे यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी नवा (New Allegation) आरोप केला आहे. अनुप डांगेंनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना लिहिलेल्या पत्रात काही अधिकाऱ्यांची नाव लिहिली आहेत. तसंच नवलानीविरोधात अधिकाऱ्यांनी मुद्दाम नीट तपास न केल्याचा आरोप ही केला आहे. उन्हाळ्यात फणस खाण्याचे आहेत अनेक फायदे; पचन नीट होतं, लिवरसाठीही असा ठरतो गुणकारी तपास अधिकारी पीआय किशोर शिंदे, त्यावेळचे एसीपी किरण काळे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी केली आहे. हायकोर्टाने नवलानी विरोधात दाखल असलेला गावदेवी पोलीस ठाण्यातील गुन्हा रद्द केलाय. या आदेशाला वरच्या कोर्टात आव्हान देऊन पुन्हा नीट तपास केला जावा अशी मागणी अनुप डांगे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Police

पुढील बातम्या