मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

फुकट जेवणासाठी पोलीस मित्राची दमबाजी, हॉटेलमालकाला गाडीच्या बोनेटवर नेलं फरफटत VIDEO

फुकट जेवणासाठी पोलीस मित्राची दमबाजी, हॉटेलमालकाला गाडीच्या बोनेटवर नेलं फरफटत VIDEO

हॉटेलमध्ये 1600 रुपये जेवणाचे बिल झाले होते. पण हे पैसे देण्यासाठी तो टाळाटाळ करत होता. वरतून हा फुकट्या आपण पोलीस मित्र असल्याचे सांगत होता.

    नाशिक, 17 ऑक्टोबर : पुण्यात (pune) काही दिवसांपूर्वी एका वरिष्ठ पोलीस महिला अधिकाऱ्याने फुकटात बिर्याणी (pune sp biryani) मागवण्याचा प्रकार घडला होता. या प्रकारामुळे पुणे पोलीस दलाच्या प्रतिष्ठेला तडा गेला होता. तर आता नाशिकमध्येही (nashik) एका पोलीस मित्राचा असाच प्रकार समोर आला आहे. एका पोलीस मित्राने आपण अधिकारी असल्याचं सांगून फुकट जेवणासाठी हॉटेलचालकाला दमबाजी केली. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या इंदिरानगर येथील हॉटेल हरी ओम ढाबा इथं ही घटना घडली आहे. शनिवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास हॉटेल हरी ओममध्ये एका तोतया पोलीस मित्राने धिंगाणा घातला होता. आपण पोलीस मित्र आहोत, अशी दमबाजी तो हॉटेल मालकावर करत होता. हॉटेलमध्ये 1600 रुपये जेवणाचे बिल झाले होते. पण हे पैसे देण्यासाठी तो टाळाटाळ करत होता. वरतून हा फुकट्या आपण पोलीस मित्र असल्याचे सांगत होता. त्याला हॉटेल मालकाने ओळखपत्र विचारले असता, त्याने ते दाखवत अधिकारी असल्याची बतावणी देखील या केली होती. बाळासाहेब मागे उभे राहिले नसते तर मोदींचं अस्तित्व संपलं असतं - भास्कर जाधव बिल न देताच तो हॉटेलच्या बाहेर पडला आणि गाडीत बसला. हॉटेलच्या मालकाने गाडीसमोर येऊन त्याला थांबण्यास सांगितले. पण पठ्या काही थांबायचे नाव घेत नव्हता. हॉटेल व्यवसायिकांला संशय आल्याने त्याने स्थानिक पोलिसांना फोन करताच तोतया पोलिसाने पळ काढला. यावेळी हॉटेल मालकाला गाडीच्या बोनटवर त्याने फरफटत नेलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी हॉटेल मालकाने पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि गाडीच्या क्रमांकावरून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Nashik

    पुढील बातम्या