नांदेड, 21 जुलै: नांदेडमधील (Nanded) एका पोलीस कर्मचाऱ्यानं (Police personnel) स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape on minor daughter) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपी पोलीस कर्मचाऱ्याची तीन लग्नं (3 Marriages) झाली आहेत. दरम्यान त्यानं दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या आपल्या दहा वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईनं शिवाजी नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचाऱ्यावर बाल लैंगिक अत्याचारसह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं नराधम पोलीस कर्मचाऱ्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संबंधित पोलीस कर्मचारी हा शिवाजी नगर पोलीस कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीनं पहिली बायको सोडल्यानंतर दुसरीशी संसार थाटला होता. परंतु तिच्याशीही न पटल्यानं त्याने अन्य एका महिलेशी लग्न केलं होतं.
हेही वाचा-नाशकात मित्राकडूनच घात,अल्पवयीन मुलीला फिरायला नेलं अन् गुंगीचं औषध देत अत्याचार
लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित पोलीस कर्मचारी दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या दोन मुलं आणि मुलींशी भेटायला नेहमी येत होता. काही दिवसांपूर्वी नराधम आरोपी आपल्या मुलांना भेटण्यासाठी दुसऱ्या बायकोच्या घरी गेला होता. दरम्यान आरोपीनं आपल्या दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. नराधम आरोपी एवढ्यावरचं थांबला नाही. तर त्यानं या घटनेबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.
हेही वाचा-सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल होताच उचललं टोकाचं पाऊल
आरोपी पोलीस कर्मचाऱ्याच्या दबावाला काही दिवस बळी पडल्यानंतर अखेर पीडितेच्या आईनं शिवाजी नगर ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित आरोपीला सध्या दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पोलिसांकडून त्याची चौकशी केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Nanded, Rape on minor