नाशिक: उच्च अधिकाऱ्याची आत्महत्या, पोलिस स्टेशनमध्येच झाडली गोळी

नाशिक: उच्च अधिकाऱ्याची आत्महत्या, पोलिस स्टेशनमध्येच झाडली गोळी

शहरातील नागरिक आधीच कोरोनाच्या दहशतीखाली असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

मालेगाव, 11एप्रिल: मालेगाव शहरात कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. शहरात कोरोनाबाधितांची संख्या 12 वर पोहोचली आहे. शहरातील नागरिक कोरोनाच्या  दहशतीखाली असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका उच्च पोलिस अधिकाऱ्याने पोलिस स्टेशनमध्येच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिस नियंत्रण कक्षात ही घटना घडली. अजहर शेख यांच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट असले तरी कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्त्या केल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे घटना घडली त्यावेळी नियंत्रण कक्षातील सुसंवाद हॉलमध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक आरती सिंह यांच्या उपस्थित कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय नगरसेवकांची बैठक सुरू होती. त्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

हेही  वाचा...कोरोना व्हायरसचा आणखी एक बळी, प्रसिद्ध अभिनेत्रीचा उपचारांदरम्यान मृत्यू

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख हे मूळ जळगाव जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांचे तीन भाऊ देखील पोलिस दलात कार्यरत आहे. मात्र, अजहर शेख त्यांच्या पत्नीने त्यांच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे ते मागील काही दिवसांपासून तणावात होते. या कौटुंबीक वादातून त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असावं, अशी चर्चा सुरु आहे.

हेही वाचा... कोरोनाचा कहर! भारतातल्या या शहरात मृत्यूआधीच कबरींसाठी खोदकामाला सुरुवात

अजहर शेख यांचा स्वभाव मनमिळावू होता. ते कायद्याच्या चौकटीत राहून सगळ्यांना सहकार्य करत असत. मालेगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये रुजू होण्याआधी ते मालेगाव येथे होते.

संकलन, संपादन - संदीप पारोळेकर

First published: April 11, 2020, 5:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading