Home /News /maharashtra /

अशीही 'पोलीसगिरी'! भुकेमुळे अन्नाच्या शोधात फिरणाऱ्या मजुराला दिला मदतीचा हात

अशीही 'पोलीसगिरी'! भुकेमुळे अन्नाच्या शोधात फिरणाऱ्या मजुराला दिला मदतीचा हात

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

समाजातील गरीब लोकांची चांगलीच त्रेधातिरपीट होत आहे.

    रत्नागिरी , 29 मार्च : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. रत्नागिरी जिल्ह्यातदेखील वाहनांना बंदी आहे. अशा वेळी मिळेल ते कामे करून दिवसभराचा आपला उदरनिर्वाह करणाऱ्या समाजातील गरीब लोकांची चांगलीच त्रेधातिरपीट होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये भारणेनाका या ठिकाणी अशाच प्रकारे एक मोलमजूर मास्क नाही म्हणून एक पिशवी तोंडाला लावून अन्नाच्या शोधात फिरत होता. नाकाबंदीत कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम यांनी त्याला जवळ बोलावून त्याला आपल्याजवळचे मास्क दिलं. तसंच सॅनिटायजरने त्यांचे हात स्वच्छ करत त्या फिरस्त्या मजुराला खाण्यासाठी अन्ना दिलं. एवढ्यावरच पोलीस कर्मचारी थांबला नाही तर त्याने त्या मजुराला तो राहात असलेल्या ठिकाणी जेवण मिळेल अशी देखील व्यवस्था केली. त्याला बाहेर फिरू नका अशी विनंतीही केली. पोलिसांमधील खाकी वर्दीतल्या या देवदूतच व्हीडिओ सध्या रत्नागिरी जिल्ह्यात चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाबाधित मृतांचा आकडा वाढला आहे. विदर्भात कोरोना व्हायरसने पहिला बळी घेतला आहे. बुलडाण्यात एका 45 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आता राज्यात कोरोनामुळे मृतांची संख्या 8 झाली आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Coronavirus, Ratnagiri

    पुढील बातम्या