धक्कादायक! भिवंडीत कामगाराच्या जीवाशी खेळ, गोदाम मालकाविरोधात गुन्हा दाखल

धक्कादायक! भिवंडीत कामगाराच्या जीवाशी खेळ, गोदाम मालकाविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांनी केमिकल साठा करणाऱ्या गोदाम मालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • Share this:

भिवंडी, 27 ऑक्टोबर : भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्ट्यात अनधिकृतपणे साठवण्यात येणाऱ्या केमिकल साठ्यांमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा गोदामांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण झाल्याने कामगाराने दिलेल्या तक्रारी वरून नारपोली पोलिसांनी केमिकल साठा करणाऱ्या गोदाम मालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या बाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, नारपोली पोलीस ठाणे हद्दीतील समर्थ लॉजेस्टिक लक्ष्मीबाई कंपाऊंड राहनाळ या ठिकाणी मस्जिद बंदर मुंबई येथील विकटोरी सेल्स इंटरप्रायजेस या कंपनीत हा प्रकार सुरू होता. Aniline oil हे केमिकल एकाड्रममधून दुसऱ्या ड्रममध्ये भरीत असताना कामगार दुखी रघुवीर महंतो वय 55 यास श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

सदरचे केमिकल हे धोकादायक आहे असे माहीत असतानाही त्याची कोणतीही माहिती कामगारास न देता आणि हाताळण्यास भाग पाडून त्याच्या जीवितास धोका निर्माण केल्याने कामगाराने नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी गोदाम मालक शैलेश तोहलीया वय 60 रा.घाटकोपर ,रशीद साजिद सिद्दीकी वय 44 रा.बंगालपुरा भिवंडी यांच्या विरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला असून आहे.

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक के आर पाटील हे करत आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: October 27, 2020, 6:56 PM IST
Tags: Bhiwandi

ताज्या बातम्या