हैदर शेख, चंद्रपूर, 8 ऑगस्ट : बल्लारपूर शहरात भर चौकात गोळ्या घालून युवकाची हत्या करण्यात आली. या प्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या परिस्थिती शांत पण तणावपूर्ण आहे.
शहरातील जुना बस स्टँड परिसरात आज दुपारी सूरज बहुरिया या युवकाची हत्या झाली. कारमध्ये बसण्यासाठी जात असलेल्या सूरज बहुरियावर बाईकस्वार तरुणांकडून गोळया झाडण्यात आल्या. आरोपींनी तब्बल 6 गोळ्या झाडत सूरज बहुरियाची हत्या केली होती.
भर चौकात हत्याकांडाने शहरात खळबळ, नेमकं काय झालं?
बल्लारपूर शहरातील जुना बस स्टँड भागात सुरज बहुरिया कारमध्ये बसून जाण्यासाठी निघत असताना काही युवक कार जवळ आले आणि त्यांनी अगदी जवळून गोळ्या झाडून सुरज बहुरिया यांना ठार मारले. चौकात झालेल्या या घटनेनंतर नागरिकांनी तातडीने बहुरिया याला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले. मात्र तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आले.
बहुरिया यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या समर्थकांनी जिल्हा रुग्णालयात गोंधळ घालून मृतदेह रुग्णवाहिकेत टाकत रुग्णवाहिका बल्लारपूर पोलीस स्टेशनच्या समोर उभी केली. यामुळे शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली होता. जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याचं बोललं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chandrapur