कोरोना संशयित नगरमधून पळून गेला नाशिकमध्ये, पोलिसांनी घेतलं ताब्यात

कोरोना संशयित नगरमधून पळून गेला नाशिकमध्ये, पोलिसांनी घेतलं ताब्यात

अहमदनगर येथून पळून नाशिकमध्ये गेलेल्या एका कोरोना संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

  • Share this:

नाशिक, 28 एप्रिल : राज्यासह देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळण्याचं प्रमाणही वाढलं आहे. मात्र अशा स्थितीतही काही लोकांना गांभीर्य नसल्याचं दिसून येत आहे. कारण जिल्हाबंदीचा आदेश असतानाही काहीजण प्रशासकीय यंत्रणेची नजर चुकवून जीवघेणा प्रवास करत आहेत. अशातच अहमदनगर येथून पळून नाशिकमध्ये गेलेल्या एका कोरोना संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

अहमदनगर येथून पळून आलेला कोरोना संशयितला नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ पोलिसांनी घेतलं ताब्यात घेतलं आहे. हातावर क्वारन्टाइनचा शिक्का असतानाही हा व्यक्ती थेट नाशिकमध्ये दाखल झाला होता. नाशिकरोड पोलिसांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी या व्यक्तीला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे.

दरम्यान, लॉकडाऊन काळात नाशिक शहरात संचार बंदीचं उल्लंघन करणाऱ्या तब्बल 3 हजार 788 जणांवर आतापर्यंत 188 कलमांतर्गत कारवाई केली आहे. तर मास्क न वापरता फिरणाऱ्या 426 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. घरात राहा, सुरक्षित रहा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिला आहे.

जिल्ह्यात काय आहे कोरोनाची स्थिती?

आज सकाळी 7 वाजता आलेल्या अहवालानुसार नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील एकूण 36 रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यात 21 पुरुष 14 महिला तसेच एक 9 वर्षीय बालकाचा समावेश आहे. तर आता मालेगावात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 164 वर गेली आहे. तर नाशिक जिल्ह्यात एकूण 185 कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.

दुसरीकडे, नाशिकच्या आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये सुरू करण्यात आलेल्या टेस्टिंग लॅबमध्ये पहिलाच रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. नाशिक जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या आणि धोका लक्षात घेत नाशिकच्या आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आली आहे. या लॅबमध्ये पहिल्या टप्प्यात एकावेळी 180 तर दुसऱ्या टप्प्यात 350 नमुण्यांची तपासणी करण्याची व्यवस्था असल्याने याची प्रशासनाला मोठी मदत मिळणार आहे.

First published: April 28, 2020, 4:11 PM IST

ताज्या बातम्या