VIDEO : कार्यालयातच जुगारी पोलिसांनी मांडला पत्त्यांचा डाव

VIDEO : कार्यालयातच जुगारी पोलिसांनी मांडला पत्त्यांचा डाव

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात ड्युटीवर तैनात पोलीस कर्मचारी चक्क कार्यालयातच जुगार खेळत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

  • Share this:

भास्कर मेहरे, प्रतिनिधी

यवतमाळ, 24 ऑक्टोबर : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात ड्युटीवर तैनात पोलीस कर्मचारी चक्क कार्यालयातच जुगार खेळत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. कायद्याचं रक्षण करण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे, तेच कायद्याला पायदळी तुडवत असल्याचं या घटनेवरून दिसून येतं.

ड्युटीवर तैनात असताना कार्यालयातच जुगार खेळणाऱ्यांमध्ये याच विभागातील पोलीस कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे.पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैद्य धंदे सुरू असल्यास त्या ठिकाणच्या ठाणेदारावर कारवाई करण्याचे आदेश गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत.

पण इथे तर दारव्हा येथील प्रकरणात खुद्द पोलीसच जुगार खेळत असल्याचं वास्तव समोर आलं आहे. जिल्ह्यात अवैध धंद्याला खुद्द पोलीसच प्रोत्साहन देत असल्याचं या घटनेवरून सिद्ध होतं. पोलीसच जर जुगार खेळत असेल तर ते जुगाऱ्यांना खरंच अटकाव करत असतील का ? असा प्रश्न उपस्थित होतो.

जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे नागरिक प्रामाणिक अधिकारी म्हणून बघतात, मात्र या घटनेमुळे जुगारी पोलिसांनी प्रामाणिक अधिकाऱ्यांवर नामुष्कीची वेळ आणली. त्यामुळे आता या सगळ्यांवर कारवाई होते का हेच पाहणं महत्त्वाचं आहे.

First published: October 24, 2018, 1:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading