बलात्कारामुळेच शिर्डीतील 6 वर्षांच्या मुलीचा मृत्यू , 24 तासानंतर गुन्हा दाखल

बलात्कारामुळेच शिर्डीतील 6 वर्षांच्या मुलीचा मृत्यू , 24 तासानंतर गुन्हा दाखल

पीडित मुलीच्या आई-वडिलांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यानंतर आता प्राथमिक माहितीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

अहमदनगर, 2 डिसेंबर : सहा वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार केल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव इथं शनिवारी झालेल्या बलात्काराच्या घटनेनं मोठा तणाव निर्माण झाला होता.

पीडित मुलीच्या आई-वडिलांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यानंतर आता प्राथमिक माहितीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचारानंतर मृत्यू झालेल्या मुलीवर कारेगाव इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने आता गावातील तणाव काहीसा निवळला आहे.

काय आहे प्रकरण?

कारेगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. एका सहा वर्षीय चिमुकलीवर अमानुष अत्याचार करण्यात आला असून, उपचारापूर्वीच त्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात तणावाचं वातावरण झालं. या अमानुष घटनेच्या निषेधार्थ सामाजिक संघटनांनी श्रीरामपूर बंदची हाक दिली होती.

पीडित चिमुकली घरी आल्यानंतर अचानक चक्कर येऊन पडली. तिची अवस्था पाहून घरच्यांनी तिला श्रीरामपूर येथील कामगार रुग्णालयात नेलं. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं तेथील डॉक्टरांनी सांगितलं. सदर मुलीच्या शरीरावर जखमा असून, अधिक वैद्यकीय तपासणीनंतर मृत्यूचं खरं कारण कळू शकेल असं डॉक्टरांनी सांगितलं.

चिमुरडी दुपारी 1 च्या सुमारास घराबाहेर खेळायला गेली आणि घरी आल्यानंतर ती अचानक चक्कर येऊन कोसळल्याचं मुलीचे वडील अर्जून सोनवणे यांनी सांगितलं. माझ्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधामाला फाशीची शिक्ष द्या, अशी मागणीही त्यांनी केली.

नराधामाला तात्काळ अटक करण्याची मागणी मुलीचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी केली आहे. जो पर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यत मृतदेह ताब्यात घेणार नाही असाही पावित्रा नातेवाईकांनी घेतला होता. तर श्रीरामपूर बंद ठेवण्याचं आवाहन सामाजिक संघटनेनं केलं होतं. पण आता गुन्हा दाखल झाल्याने वातावरण निवळलं आहे.

'ईव्हीएमजवळ कोणी आल्यास गोळी घाला', महिला जिल्हाधिकाऱ्याचा VIDEO व्हायरल

First published: December 2, 2018, 4:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading