मतदान केंद्रावर वाद- काँग्रेसचे उमेदवार नाना पटोलेंसह तिघांवर गुन्हा दाखल!

मतदान केंद्रावर वाद- काँग्रेसचे उमेदवार नाना पटोलेंसह तिघांवर गुन्हा दाखल!

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान नागपुरातील केंद्रावर वादावादी केल्याप्रकरणी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

नागपूर, 26 मे: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान नागपुरातील केंद्रावर वादावादी केल्याप्रकरणी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या अन्य 3 कार्यकर्त्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत काँग्रेसने नाना पटोले नागपूरमधून भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरुद्ध उभे होते. या लढतीत गडकरी यांनी मोठ्या मतांनी बाजी मारली होती.

मतमोजणी दरम्यान नागपुरमधील केंद्रावर झालेल्या वादावादी प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पटेले यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते अभिजित वंजारी, नगरसेवक बंटी शेळके आणि प्रशांत पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पटोले यांच्यासह या सर्वांवर आयपीसी 188 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SPECIAL REPORT: डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण

First published: May 26, 2019, 7:47 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading