अर्थमंत्र्यांच्या चंद्रपुरात एक कोटी रुपयांच्या दारुच्या बाटल्यांवर फिरवला रोडरोलर

अर्थमंत्र्यांच्या चंद्रपुरात एक कोटी रुपयांच्या दारुच्या बाटल्यांवर फिरवला रोडरोलर

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे होमटाऊन असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू असली तरी आजही जिल्ह्यात चोरमार्गाने मोठ्या प्रमाणावर दारूची आयात होते.

  • Share this:

चंद्रपूर, 21 जुलै- कोर्टाच्या परवानगीनंतर चंद्रपुरात 189 गुन्ह्यात जप्त केलेली तब्बल एक कोटी रुपयांच्या दारुच्या बाटल्यांवर रोडरोलर फिरवण्यात आला. डिसेंबर ते मे या महिन्यात बल्लारपूर पोलिस व उत्पादन शुल्क विभागाने ही दारु जप्त केली होती.

चंद्रपूरच्या बल्लारपूर पोलीस व उत्पादन शुल्क विभागाने रविवारी तब्बल एक कोटी रुपयांची जप्त केलेल्या दारुवर रोडरोलर फिरवून नष्ट करण्यात आली. कोर्टाच्या परवानगीनंतर बल्लारपूर शहरालगतच्या दहेली गावाशेजारी हा दारूसाठा नष्ट करण्यात आला. नष्ट दारुसाठा 189 गुन्ह्यात जप्त करण्यात आला होता. यावेळी पोलीस व उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे होमटाऊन असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू असली तरी आजही जिल्ह्यात चोरमार्गाने मोठ्या प्रमाणावर दारूची आयात होते. वेळोवेळो झालेल्या कारवाईने हे सिद्ध झाले आहे. बल्लारपूर पोलिसांनीही खबरी व कर्मचाऱ्यांना कार्यरत करत अवैध दारू तस्करांविरोधात मोहीम सुरु केली आहे. याच मोहिमेदरम्यान पोलिसांनी डिसेंबर ते मे या काळात कोट्यवधी रुपये किमतीची दारू जप्त केली. या कारवाईनंतर पोलिसांनी कोर्टाकडे दारू नष्ट करण्याची मागितली. त्यानुसार कोर्टाकडून परवानगी मिळाल्यावर पोलीस व उत्पादन शुल्क विभागाने 2 ट्रक दारुसाठा रोडरोलरच्या साहाय्याने नष्ट केला. बल्लारपूर शहरालगतच्या दहेली गावाजवळील हॉट प्लेसवर हा साठा नष्ट झाला. या कारवाईनंतर जेसीबीच्या साहाय्याने काचांचा साठा खोदलेल्या खड्ड्यात बुजवण्यात आल्याची माहिती बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक दीपक गोतमारे यांनी दिली.

पोलिसांचा आता नवा फंडा, खाद्यांवर लागणार LED दिवे

First published: July 21, 2019, 9:10 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading