झीरो डिग्री बारमध्ये रात्रभर लहान मुला-मुलींचा धिंगाणा, धाड टाकल्यावर धक्कादायक खुलासा

झीरो डिग्री बारमध्ये रात्रभर लहान मुला-मुलींचा धिंगाणा, धाड टाकल्यावर धक्कादायक खुलासा

झीरो डिग्री हा बार पहाटेपर्यंत बेकायदा सुरू असतो. याची खबर पोलिसांना लागली. त्यानंतर पोलीसांनी थेट बारवर धाड टाकली. गुन्हे शाखेचे डीसीपी गजानन राजमाने यांनी ही धाड टाकली आहे.

  • Share this:

नागपूर, 10 सप्टेंबर : मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये बारवर धाड टाकण्यात आली आहे. या धाडीत धक्कादायक चित्र समोर आलं आहे. हल्लीच तरुणाई आणि अल्पवयीन मुलींचा धिंगाणा बारमध्ये सुरू असल्याचं समोर आलं आहे. नागपूरातील 'झीरो डिग्री' बारवर पोलीसांच्या गुन्हे शाखेने धाड टाकली आहे. या धाडीमध्ये तब्बल 57 ग्राहकांना आणि अनेक अल्पवयीन मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती देण्यात आली आहे.

झीरो डिग्री हा बार पहाटेपर्यंत बेकायदा सुरू असतो. याची खबर पोलिसांना लागली. त्यानंतर पोलीसांनी थेट बारवर धाड टाकली. गुन्हे शाखेचे डीसीपी गजानन राजमाने यांनी ही धाड टाकली आहे. बारमध्ये गुन्हेगारी आणि असामाजिक तत्त्वांचा वावर होत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, या बारमध्ये अल्पवयीन मुलीसुद्धा असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागपुरात तरुणाई धोक्यात असल्याचं चित्र समोर आलं आहे.

पोलिसांनी अचानक बारमध्ये धाड टाकल्यामुळे एकच खळबळ उडाली. तिथे असलेल्या ग्राहकांची पळापळ सुरू झाली. या बारमध्ये पहाटेपर्यंत 57 ग्राहक आणि काही अल्पवयीन मुलं आणि मुली अश्लील चाळे करत असल्याचं समोर आलं. या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून कसून चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान, बारमध्ये असे धक्कादायक प्रकार सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे आपली मुलं रात्रीच्या वेळी कुठे जातात याची माहिती पालकांना असावी अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.

इतर बातम्या - स्पामध्ये सुरू होतं SEX रॅकेट, तरुणींसोबत विवस्त्र होते लोक, अनेक कंडोम सापडले!

हल्ली प्रत्येक शहरांत बार, स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट, नाईट क्लब, पार्ट्या असे अनेक प्रकार सर्रास सुरू आहे. दिल्लीमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. दिल्लीमध्ये स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. सेक्स रॅकेटवर छापे टाकल्यानंतर यातून अनेक तरुणींची सुटका करण्यात आली. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल सध्या खूप सक्रिय आहेत. मालीवाल यांनी दिल्लीच्या नवादा भागात दोन स्पा सेंटर ( जन्नत स्पा आणि जस्मीन स्पा) वर छापा टाकला. या स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेटवर रंगे हात छापा मारण्यात आला.

इतर बातम्या - भाजप-सेनेच्या मेगाभरतीमुळे युतीत मोठा ट्विस्ट, असा असेल नवा फॉर्म्युला

पोलिसांनी छापा मारल्यानंतर 9 तरूणींना सोडवण्यात आलं. या संदर्भात स्वाती यांनी ट्वीट करून माहिती दिली. तसंच या कारवाई दरम्यान स्वाती यांनी व्हिडिओही शेअर केला. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांनी यावेळी दिल्ली पोलिस आणि एमसीडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अशा घटनांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. दिल्ली पोलिस आणि एमसीडी शांत का आहेत? असा सवाल उपस्थित केला.

इतर बातम्या - मुंबईत दुहेरी हत्याकांड! दिराने केला वहिनी-पुतण्याचा खून; रात्रभर राहिला मृतदेहांसोबत...

कंडोमही केले जप्त...!

कारवाई दरम्यान, दोन्ही स्पा पार्लरमधून अनेक आक्षेपार्ह वस्तूही जप्त करण्यात आल्या. वापरलेले कंडोम आणि त्यांची अनेक पाकिटंही जप्त केली. या प्रकरणात स्वाती मालीवाल म्हणाल्या की, मसाजच्या नावाखाली दिल्लीत अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे सेक्स रॅकेट चालवली जातात. स्पाच्या प्रत्येक खोलीत निर्वस्त्र मुली आणि मुलं सापडली. त्याचवेळी मॅनेजर आणि स्वतः महिलांनी कबूल केलं की, इथ सेक्स रॅकेट चालवलं जातं. यानंतर स्पा मालकांविरोधात त्वरित एफआयआर नोंदवण्याची मागणी स्वाती मालीवाल यांनी केली होती.

स्पा सेंटरमध्ये सुरू होतं SEX रॅकेट, लाईव्ह रेडचा धक्कादायक VIDEO

Published by: Renuka Dhaybar
First published: September 10, 2019, 2:01 PM IST

ताज्या बातम्या